सावंतवाडी : न्हावेली माऊली मंदिरात २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार २२ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक, सकाळी ९ वाजता नयाचा कार्यक्रम, रात्री ७.३० वाजता महाआरती, रात्री ८ वाजता देऊळवाडी भजनाचा कार्यक्रम, रात्री ८.३० वाजता श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ, कुडाळ, भैरववाडी रात्री ९.३० वाजता नवोदित बाल दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा नाट्यप्रयोग.
मंगळवार २३ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,सकाळी ९ वाजता अभिषेक,रात्री ७.३० वाजता महाआरती,रात्री ८ वाजता नागझरवाडी,भजनाचा कार्यक्रम, रात्री ८.३० वाजता श्री देवी सातेरी फुगडी मंडळ,नेमळे.
बुधवार २४ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक, रात्री ७.३० वाजता महाआरती,रात्री ८ वाजता पार्सेकरवाडी भजनाचा कार्यक्रम, रात्री ८.३० वाजता खेल पैठणीचा कार्यक्रम,तसेच हळदीकुंकू, रात्री १० वाजता दांडिया कार्यक्रम.
गुरुवार २५ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा,दुपारी १ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद, रात्री ७.३० वाजता महाआरती, रात्री ८.३० वाजता चौकेकरवाडी भजनाचा कार्यक्रम, रात्री ९.३० वाजता नितीन आसयेकर प्रस्तुत, श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ, यांचा ‘बाळूमामा’.
शुक्रवार २६ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक, सकाळी ९ वाजता नवचंडिका धार्मिक कार्यक्रम,दुपारी १ वाजता आरती व महाप्रसाद,रात्री ७.३० वाजता महाआरती,रात्री ८ वाजता भटाचेटेंब मंडळाचा व मेस्रीवाडी भजनाचा कार्यक्रम,रात्री ९.३० वाजता डबलबारी भजनाचा सामना श्री रामेश्वर शांतादुर्गा भजन मंडळ, तेर्सेबांबर्डे बुवा – अंकुश साटेलकर (पखवाज – आंनद मोर्ये,तबला गोट्या कुबल) विरुद्ध श्री स्वामी समर्थ भजन मंडळ,कुडाळ, बुवा- साईश तोडकर (पखवाज – श्रीराज मोरजकर, तबला – गणेश आडेकर).
शनिवार २७ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा,दुपारी १ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद, रात्री ७.३० वाजता महाआरती, रात्री ८ वाजता धाऊसकरवाडी भजनाचा कार्यक्रम,रात्री ९.३० वाजता डबलबारी भजनाचा सामना श्री आंदुर्लाई भजन मंडळ, आंदुर्ले कुडाळ, बुवा विनय नांदोस्कर (पखवाज – जितेंद्र मेस्री तबला – ललित कोलंबेकर) विरुद्ध सद्गगुरु संगीत भजन मंडळ, पिंगुळी कुडाळ बुवा – वैभव सावंत (पखवाज – निखिल पावसकर, तबला साई नाईक).
रविवार २८ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा,दुपारी १ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद, रात्री ७.३० वाजता महाआरती,रात्री ८ वाजता भोमवाडी भजनाचा कार्यक्रम.
सोमवार २९ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा,दुपारी १ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद,रात्री ७.३० वाजता महाआरती,रात्री ८ वाजता रेवटेवाडी भजनाचा, रात्री ८.३० वाजता समईनृत्य,रात्री ९ वाजता दांडिया,रात्री ९.३० वाजता अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ,निरवडे.
मंगळवार ३० रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,रात्री ७.३० वाजता महाआरती, रात्री ८ वाजता मोहिते भजन मंडळाचा व टेंबकर भजनाचा कार्यक्रम.
बुधवार १ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,रात्री ७.३० वाजता महाआरती, रात्री ८ वाजता निर्गुणवाडी भजनाचा कार्यक्रम, रात्री ९ वाजता देवतांचे धार्मिक कार्यक्रम.
गुरुवार २ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,देवतांचे धार्मिक विधींचा कार्यक्रम,रात्री १० वाजता देवतांची शुभलग्न व सोने लुटने कार्यक्रम होणार आहेत.


