सावंतवाडी : मल्ल सम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व सावली फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘घरगुती गणपती सजावट जिल्हास्तरीय उत्कृष्ट रील्स मेकिंग स्पर्धेचा’ पारितोषिक वितरण समारंभ रविवारी कळसूलकर हायस्कूलच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मल्लसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख यांच्यासह उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सेक्रेटरी ललित हरमलकर, सावली फाऊंडेशनच्या अध्यक्ष सावली पाटकर, सेक्रेटरी प्रा. सचिन पाटकर, मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या सहसेक्रेटरी फिजा मकानदार यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.


या स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परीक्षकांच्या निरीक्षणानंतर उत्कृष्ट रील्स सादर करणाऱ्या विजेत्यांची निवड करण्यात आली.
🏆 प्रथम पारितोषिक – मनोज बांदिवडेकर (निरवडे) – “कोकण रेल्वे प्रदर्शन”
🥈 द्वितीय पारितोषिक – महेंद्र पालव (माडखोल) – “रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा – ॲम्बुलन्स प्रदर्शन”
🥉 तृतीय पारितोषिक – शुभम जाधव (निरवडे)
🔸 उत्तेजनार्थ पारितोषिक – किरण आकेरकर (आकेरी) – ‘श्रीकृष्ण नरकासुर युद्ध’ आणि यश सावंत व रोहित जाधव – संयुक्त सादरीकरण.
या विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. विजेते निवडताना दोन्ही संस्थांच्या मान्यतेने व सर्व परीक्षकांच्या संमतीने पारदर्शक निवड प्रक्रिया राबवण्यात आली.
यावेळी प्रा. रूपेश पाटील म्हणाले की, आपल्या कोकणात टॅलेंटची अजिबात कमी नाही. फक्त गरज आहे ते टॅलेंट ओळखून त्यात सातत्याने प्रयत्नशील राहण्याची. रील्स स्पर्धेतून अनेकांनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्याचे दमदार प्रदर्शन केले आहे. त्यांनी आपली ही कला यापुढे अधिक प्रमाणात विकसित करून सतत नवनवीन प्रयोग करावेत. आजच्या काळात आपली ही कला आपल्या उपजीविकेचे साधन बनू शकते, असेही प्रा. पाटील यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास कामाक्षी महालकर, फातिमा मकानदार, भाविका कदम, श्रुती सावंत, नासिर मकानदार, नागेश सूर्यवंशी, कृष्णा हरमलकर, बुधाजी हरमलकर, दशरथ गोंद्याळकर, गौरव कुडाळकर, गणेश राऊळ, संकेत माळी, योगेश बेळगावकर, देवेश पालव, साबाजी परब, दिपाली राऊळ, मिताली राऊळ, संचिता केनवडेकर, सान्वी बिद्रे आदींची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमचे सूत्रसंचालन कामाक्षी महालकर हिने केले तर आभार प्रा. सचिन पाटकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक संस्थांनी अथक परिश्रम घेतले. विजेत्यांनी आयोजकांचे आभार मानले.


