सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यासह शहरात सार्वजनिक मंडळांमध्ये उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात आदिशक्ती, नवदुर्गांचे आगमन झाले. पुढील नऊ दिवस हा उत्सव साजरा होणार आहे. घरोघरी, मंदीरात देखील उत्सव साजरा होणार आहे.
मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो. ठिकठिकाणी देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर वाद्यांच्या गजरात आणि ‘जय माता दी’च्या जयघोषात देवीच आगमन करण्यात आले. यानिमित्त मंडळांमध्ये रोषणाई आणि आकर्षक सजावट करण्यात आली असून दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत आहे. पुढील 9 दिवस पारंपरिक गरबा आणि दांडियासह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या नऊ दिवसांच्या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवशी देवीच्या एका विशिष्ट रूपाची पूजा करण्याची परंपरा आहे. अनेक भाविक 9 दिवस उपवास करतात. मोठ्या संख्येने भाविक लोक यात सहभागी होतात.


