कसाल : भाजप दिव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्गच्या वतीने सिद्धिविनायक मंदिर कसाल येथे ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी अध्यक्ष प्रभाकर सावंत, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे, सहसंयोजक श्यामसुंदर लोट, प्रकाश वाघ, सुनील तांबे, प्रकाश सावंत, प्रशांत कदम, विजय कदम, अश्विनी पालव, रंजना इंदुलकर, संस्था कर्मचारी संजना गावडे, प्रणाली दळवी, विशाखा कासले, सिद्धेश माळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम हेलन किलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश वाघ यांनी केले. जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सेवा पंधरवडा अंतर्गत उपस्थित दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष बाळू देसाई यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांना सेवा पंधरवडा अंतर्गत अधिक माहिती दिली. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रभाकरजी सावंत यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. व सांगितले भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीची वाढ होऊन प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकारिणी व्हावी तसे प्रयत्न भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने केले जावे व त्यासाठी उपस्थित दिव्यांग बांधवांनी उत्साह दाखवावा व एकत्र येऊन एकजुट दाखवावी असे उदगार व्यक्त केले. व भारतीय जनता पार्टी व शासन आपल्या पाठीशी आहे असे सांगितले.
यावेळी शाकीर शेख या उभयताचा विवाहानिमित्त सत्कार करण्यात आला. व गरजू दिव्यांग बांधवांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साहित्य वाटप करण्यात आले. दिविजा वृद्धाश्रम असलदे या आश्रमला व्हीलचेअर देण्यात आले. तसेच अमित सुतार यांना व्हीलचेअर देण्यात आली. रमेश गावडे व शाकीर शेख यांना इलेक्ट्रिक अंधकाठी देण्यात आली. व पाच दिव्यांग बांधवांना पांढरी काठी देण्यात आली. पाच कर्णबधीर व्यक्तींना कानाची मशीन देण्यात आली. तसेच अंध गॉगल देण्यात आले. व दोन दिव्यांग बांधवांना रेल्वेपास देण्यात आले.
या कार्यक्रमाला शंभरहून जास्त दिव्यांग उपस्थित होते . यावेळी सुनील तांबे यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांचे आभार मानले .


