- साबाजी परब.
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा आज सिद्धिविनायक पेडणेकर हॉल, रेल्वेस्टेशन रोड कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकारिणीमधील सभासद, स्वीकृत सभासद,जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि खेळी-मेळी च्या वातावरणात संपन्न झाली.
या सभेला महासंघाचे अध्यक्ष हेमंत भिमसेन करंगुटकर यांनी प्रास्ताविक करून सभेला सुरुवात करून वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली.त्यानंतर मागील दिनांक.29.09.2024च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करण्यात आले. त्यांनंतर सन 2024/2025 चा वार्षिक जमाखर्च वाचून मंजूर कारण्यात आली.आणि सन 2025/2026 च्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. तसेच सन 2024 व सन 2025 च्या लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करण्यात आले.त्यानंतर सन 2025 /2026 या सालाकरीता शासकीय प्रमाणित लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे व मानधन अदा करणे यासंदर्भात चर्चा झाली.
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ च्या कुडाळ येथे होणाऱ्या भवना संदर्भातील भूखंडा विषयी कागदपत्रांची तपासणी आणि पडताळणी करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे भवन कसे लवकर होईल यासंदर्भात सर्वानुमते चर्चा कारण्यात आली.आणि त्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी योग्य नियोजन कारण्यात आले.
त्यानंतर भंडारी समाज बांधवानच्या वतीने भंडारी महासंच्या वतीने ओबीसी च्या आपल्या 27% आरक्षणस कोणताही धक्का बसु नये यासाठी भंडारी महासंघाच्या वतीने ठराव घेण्यात आला.आणि ‘तो ‘ठराव ओबीसीचे जिल्हाध्यक्ष नितिन वाळके यांच्याकडे पाठवावा असे नमुद करण्यात आले.
त्यानंतर समिल जळवी यांनी सांगितले की..23,24 सप्टेंबर रोजी कुडाळ येथे झालेल्या ओबीसी आरक्षित 52% समाज दोन दिवशीय उपोषण आणि धरणे आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी बांधवानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातुन दोन शिवशीय आंदोलनात भंडारी समाज बांधवानी आपली उपस्थिती दर्शवुन ओबीसी संघटनेस चांगले सहकार्य केले आणि हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी लाक्षणिक उपस्थिती दर्शवली होती.त्याबद्दल युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.समिल जळवी यांनी सर्व भंडारी समाज बांधवानचे आभार मानले.आणि पुढील काळात ओबीसी संघटनेच्या एकीसाठी किंवा ओबीसीच्या आरक्षणासाठी भंडारी समाजाने एकत्र यावे असे आवाहन देखील युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.समिल जळवी यांनी केले.
या भंडारी वार्षिक सर्वसाधारण सभेला महासंघाचे जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर, जिल्हा सचिव हेमंत सावंत, माजी जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष समील जळवी, कार्याध्यक्ष राजू गवंडे, कुडाळ तालुकाध्यक्ष आत्माराम बंगे, कुडाळ तालुका सचिव शरद पावसकर, कुडाळ तालुका सदस्य माजी तालुकाध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर, जिल्हा सदस्य विकास वैद्य, मालवण तालुकाध्यक्ष रवींद्र तळाशिलकर, जिल्हा सदस्य जयप्रकाश चमणकर, जिल्हा सदस्य प्रियदर्शन कुडव, जिल्हा सदस्य भरत आवळे, जिल्हा सदस्य दीपक कोचरेकर, जिल्हा सदस्य अनुप नाईक, जिल्हा सदस्य श्रीकांत वेंगुर्लेकर, जिल्हा सदस्य चंद्रकांत कोचरेकर, जिल्हा सदस्य विलास करंजेकर, जिल्हा सदस्य दीपक कोचरेकर, नगरसेविका सौ. श्रेया गवंडे, उदय मयेकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष मोहन गावंडे, भंडारी जिल्हा सदस्य विलास असोलकर अन्य भंडारी समाज बांधव उपस्थित होते.


