सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघातील सुज्ञ आणि जाणकार जनतेने एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा का निवडून दिले? तर ही आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या कार्याची पावती दिली आहे. आणि म्हणूनच आमचे नेते आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर हे जनतेने सतत निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. आपल्या सावंतवाडी मतदारसंघातील विशेषतः तिन्ही तालुक्यातील जनता अत्यंत संस्कारशील आणि सुज्ञ आहे. त्यामुळे यापुढे आमच्या नेत्यांबद्दल वक्तव्य करताना रवी जाधव यांनी थोडा अभ्यास करावा, चिंतनही करावी, उगीच कोणाच्या तरी भावनेच्या आहारी जाऊन कोणताही आधार न घेता बेताल वक्तव्य करू नये. आज त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं ते नक्कीच निषेधार्ह आहे.
वास्तविक पाहता सामाजिक काम करताना त्यांनाचं आता ‘राजकारणाची हवा’ लागलेली दिसते. त्यामुळे अगोदर आपण जो वसा घेतला आहे तोच वसा घेऊन आपण पुढे जावे. रवी जाधव यांनी यापूर्वी चांगले काम केलं आहे. त्यांचा यापूर्वीही आम्ही आदर केलेला आहे. मात्र त्यांनी आमच्या आधाराला पात्र असं वक्तव्य करावं. यापुढे बोलताना आपलं वय आणि आपली एकूण पात्रता याचं देखील भान राखावं, अशी विनंती वजा सूचना युवा सेना पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांना दिली आहे.
रवी जाधव यांनी नुकतीच माजी मंत्री तथा आमदार केसरकरांवर टीका केली. त्याचे प्रत्युत्तर देताना युवासेना पदाधिकारी पुढे म्हणतात कि, यापूर्वी रवी जाधव यांच्या काही चांगल्या संकल्पनांना प्रत्यक्षात पूर्णत्व देण्यासाठी आमचे नेते आणि सातत्याने जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणारे आमदार दीपक केसरकर यांनीच पुढाकार घेतला आहे. सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांच्या अनेक उपक्रमांना आमदार दीपक केसरकर यांनी मदत केली आहे. यापुढेही आमची तीच भावना आहे. मात्र याचा त्यांना कदाचित विसर पडला असेल. कुणाच्यातरी भावनिक आहारी जाऊन ते बेताल वक्तव्य करत सुटत आहेत. त्यांनी आमच्या ज्या नेत्यांवर टीका केली त्या नेत्यांची आतापर्यंतची राजकीय वाटचाल आणि त्यांचे राज्यातील राजकारण आणि समाजकारण यांच्यातील योगदान याचा जरा सखोल अभ्यास करावा. आणि अशी बेताल व बालिश वक्तव्य पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यावी. अन्यथा आम्हालाही शिवसेना स्टाईलने उत्तर देता येते, असाही इशारा युवासेना पदाधिकारी यांनी रवी जाधव यांना दिला आहे.


