सावंतवाडी : येथील तहसील कार्यालयामार्फत २८ सप्टेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. हा दिवस साजरा करणेबाबत शासनस्तरावरून निर्णय घेण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने २८ सप्टेंबर या दिवशी रविवार असल्यामुळे दुसऱ्या दिवशी अर्थात सोमवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी सावंतवाडी येथील तहसील कार्यालयात ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यावेळी माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्याचे सावंतवाडी तालुकाप्रमुख सुशील चौगुले यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. सुशील चौगुले हे सामाजिक कार्यकर्ते असून माहिती अधिकार याबाबत त्यांचा विशेष अभ्यास असल्यामुळे सावंतवाडी तहसील कार्यालयाकडून त्यांच्या विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी नागरिकांनी सोमवारी २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी सावंतवाडी तहसील कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी तहसील कार्यालयाकडून करण्यात आले आहे.


