सावंतवाडी : महाराष्ट्रात सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्ती आलेल्या असमानी संकटामुळे नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना आणि जनतेला बाहेर काढण्यासाठी सीएम रिलीफ फंड करीता जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले होते. याला प्रतिसाद देत सीएम रिलीफ फंडसाठी ५१ हजार रूपयांची मदत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांनी केली. भाजपाच्या माध्यमातून आयोजित ‘नमो युवा रन’ कार्यक्रमावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
राज्यातील शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून बाहेर येण्यासाठी आपला हातभार असावा या उद्देशाने आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाला साथ देण्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांनी सीएम रिलीफ फंड साठी ५१ हजार रूपयांची मदत केली. यावेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, राजू राऊळ,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदिप मेस्त्री,वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सिद्धेश चिंचळकर,जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा संतोष पुजारे, कुडाळ युवामोर्चा मंडलअध्यक्ष तन्मय वालावालकर, कणकवली मंडलअध्यक्ष सर्वेश दळवी, कणकवली युवामोर्चा शहर अध्यक्ष सागर राणे जिल्हा बँक संचालक रवींद्र माडगावकर,आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ,सावंतवाडी युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक,आंबोली उवमोर्चा अध्यक्ष निलेश पास्स्ते,बांदा युवा मोर्चा अध्यक्ष सिध्देश कांबळी,वेंगुर्ला मंडळ अध्यक्ष प्रणव वायंगणकर तसेच भारती जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


