सावंतवाडी : सावंतवाडीत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी तर्फे यंदा भव्य ओपन गरबा नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राणी पार्वतीदेवी हायस्कुल हॉलमध्ये होणार आहे.
दिनांक २९ व ३० सप्टेंबर रोजी रात्री या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यंदाचा गरबा नाईट मोठ्या उत्साहात व जोशात साजरा होणार असून सावंतवाडीतील तरुणाईला आनंदाने सहभागी होण्यासाठी आयोजकांनी आवाहन केले आहे.


