सावंतवाडी : तालुक्यातील कोलगाव येथील ओमकार नवरात्रौत्सव मंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांना ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते. या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री विशाल परब यांचा मंडळाच्या वतीने विशेष ग्राम-सत्कार करण्यात आला. मंडळाच्या वतीने आयोजित एका विशेष समारंभात विशाल परब यांनी आजवर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात युवाशक्तीचे प्रतिनिधित्व करत केलेल्या कार्याबद्दल कौतुक करण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले .
यावेळी सत्काराला उत्तर देताना विशाल परब यांनी मंडळाच्या सातत्यशील उपक्रमांचे कौतुक करत अशाच पद्धतीने उत्तरोत्तर प्रगतीस व यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उत्सवाच्या निमित्ताने आयोजित धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे कोलगाव परिसरात उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे, मातृशक्तीच्या उपासनेची ही गावाची परंपरा अशीच उज्वलपणे चालत राहो अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.


यावेळी व्यासपीठावर मंडळाचे सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशाल परब यांच्यासमवेत या कार्यक्रम प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक श्री महेश सारंग, सरपंच व भाजपा आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, चंदन धुरी, संदीप हळदणकर, दिनेश सारंग, विनायक ठाकूर, सचिन राऊळ, संतोष बिले, टिळवे बंधू, श्री. चेंदवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.


