सावंतवाडी : आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवादरम्यान पोलीस, होमगार्ड कर्मचारी बांधवांना अविरत सेवा द्यावी लागणार आहे. येथे पोलीस कर्मचाऱ्यांचे शिस्तबद्ध व्यवस्थापन गणेश चतुर्थी तसेच प्रत्येक सणांना दिसत असते. शहरातील नागरिक, वाहनधारक व व्यापाऱ्यांना त्यांचे सहकार्य सोयीचे ठरते. परंतु प्रामाणिक सेवा देणार्या या बांधवांची ऊन, वारा, पावसामध्ये होणारी धावपळ सहसा कोणी पाहत नाही. मात्र सामाजिक बांधिलकीच्या सचिव समीरा खलील यांच्याकडून या पोलीस, होमगार्ड कर्मचारी बांधवांसाठी शीत पेय व बिस्किटे देण्यात आले. यासाठी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, सुजय सावंत व संजय पेडणेकर यांनी ही सेवा दिली. समीरा खलील व सामाजिक बांधीलकीच्या या स्नेहमय सेवेमुळे सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकीचे आभार मानत त्यांच्या टीमचे कौतुक केले आहे.
प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस, होमगार्ड बांधवांना ‘सामाजिक बांधिलकी’कडून स्नेहमय सेवा.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


