सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस केलेल्या लिपिक-टंकलेखक पदावरील उमेदवारांना तसेच नवीन अनुकंपा धोरणानुसार निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण होणार आहे. हा कार्यक्रम udya शनिवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडणार आहे. यावेळी मुंबई येथे आयोजित मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था देखील जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आलेली आहे.
या कार्यक्रमास आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील तरुणाईसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासह शासकीय सेवेत नव्या उमेदवारांचे स्वागत करण्याचा हा उपक्रम जिल्ह्यातील एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा-
जिल्हास्तरावरील कार्यक्रम जिल्ह्यातील पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ११ वाजता सुरु होणार आहे. सकाळी ११.०० ते ११.३० या दरमयान कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे भाषण होईल. सकाळी ११.३० पासून मुंबई येथे आयोजित मुख्य कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांच्या मुख्य कार्यक्रमातील भाषण समाप्त झाल्यानंतर जिल्हास्तरावर नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.
अनुकंपा धोरणानुसार नियुक्ती-
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय -8, अधीक्षक अभियंता दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प – 2, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक – 1, सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय – 1, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय – 7, सावंतवाडी नगरपरिषद- 1, जिल्हा परिषद- – 5
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे लिपिक-टंकलेखक पदावरील नियुक्ती-
जिल्हाधिकारी कार्यालय (महसूल) – 37, जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा) – 18, सहायक आयुक्त कौशल्य विभाग-1, कृषी विभाग- – 8, व्यवसाय शिक्षण- 1, नगर रचना- 1, पोलीस- 5, महिला व बालविकास विभाग- 1, वैद्यकीय महाविद्यालय- 1, राज्य उत्पादन शुल्क-1, उपवनसंरक्षक -6


