सावंतवाडी : आरोपी क्रमांक 1) केसाराम बेचराराम देवासी (वय 36, सध्या राहणार – पेडणे -गोवा), आणि 2) हडमतसिंग वचनसिंग चौहान (वय 28, सध्या राहणार मांजरे – गोवा.) दोन्ही आरोपी मूळ राहणार जल्हौर, राजस्थान यांनी आरोपी क्रमांक 3) ईश्वर सिंग रणजीत सिंग राजपूत (वय 32, राहणार सध्या मांजरे – गोवा मूळ राहणार जल्होर, भिनमाल राज्य – राजस्थान) याच्या मालकीची गाडी वरील दोन्ही आरोपी हे फॉर्च्यूनर गाडीला नंबर प्लेट क्रमांक GA/08/K/88878 ही बनावट नंबर प्लेट लावून गोवा ते राजस्थान अशी 3,83,000/- रुपयांचे 82 बॉक्स गोवा बनावटीची दारू नमुद वाहनातून वाहतूक करताना एलसीबीचे पीएसआय श्री. भोसले, जमादार श्री. राठोड व त्यांचे पथक यांना मेवाड या ठिकाणी मिळून आल्याने, 30,00,000/- रुपयाचे फॉर्च्यूनर व वरील दारू असा एकूण 33,93,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दारू वाहतूक करणारे आरोपी क्रमांक एक व दोन यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे.

सर्व आरोपींवर खोटी नंबर प्लेट लावून फसवणूक करणे व अवैध दारू वाहतूक करणेबाबत गुन्हा सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील करीत आहेत.


