कणकवली : सध्याच्या प्राथमिक शिक्षणाच्या दुरावस्थेच्या अवस्थेत ओझरम सेवा मंडळ, मुंबई (तालुका कणकवली) या संस्थेने ओझरम पूर्ण प्राथमिक शाळा नंबर-०१ या शाळेची केलेली प्रगती समाजाने आणि शासनाने नोंद घेण्यासारखी आहे. या मंडळाने लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कूलबस ची मोफत सोय उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करून देताना या वसतिगृहाचे व्यवस्थापन योग्य होण्यासाठी ग्रामस्थांच्या दक्षता समितीची स्थापना, शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ई- लर्निंग ची सुविधा, शाळा हे आपल्या कुटुंबाचा एक भाग मानण्याची विकसित केली मानसिकता, शाळेतील स्वच्छता आदी सोयी थक्क करणाऱ्या आहेत.
या सुविधामुळे ज्या ग्रामस्थांची मुले इंग्रजी शाळेत जात होती तिथून त्या मुलांना त्यांनी काढून या शाळेत घेतलेला प्रवेश, या शाळेतील शिक्षक वर्गाची मेहनत या सर्व गोष्टीमुळे ओझरम सेवा मंडळाने संपूर्ण समाजासमोर शिक्षणाच्या विकासाचा एक आदर्श प्रयोग मांडला आहे.
या प्रयत्नांना दाद देण्यासाठी गोपुरी आश्रमाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमात ओझरम सेवा मंडळाचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील शाळा समित्यांनी पूर्ण प्राथमिक शाळा ओझरम नंबर-०१ ला आवर्जून भेट देऊन या शाळेच्या आदर्श उपक्रमांची माहिती करून घेऊन शासनाच्या प्राथमिक शिक्षणाच्या अनास्थेला प्रभावी पर्याय देण्याचा प्रयत्न करावा असे आव्हानही गोपुरी आश्रमातर्फे करण्यात आले आहे.
या सन्मानाच्या वेळी मराठी भाषा अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार, भाषा तज्ज्ञ डॉ. प्रकाश परब, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर गोपुरी आश्रमाचे उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, सचिव बाळू मेस्त्री, खजिनदार अमोल भोगले, रान माणूस प्रसाद गावडे, संचालिका अर्पिता मुंबरकर, अॅड. संदीप निंबाळकर, जेष्ठ कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर, गोपुरी सदस्य विनायक सापळे,संदीप सावंत यांच्यासहित जिल्ह्यातील
गोपुरी आश्रमातर्फे ओझरम सेवा मंडळ मुंबईचा विशेष सन्मान ! ; प्राथमिक शिक्षणातील उल्लेखनीय कार्याबद्दल केला गौरव!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


