वेंगुर्ला : काल वेळागर समुद्रात आठ जण बुडाले होते. शिरोडा – वेळागर येथील समुद्रात दुपारी ४:४५ दरम्यान ८ पर्यटक बुडाल्याची घटना घडली. सदर पर्यटकातील ४ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलेले आहेत. यातील ३ पर्यटक मयत असून एक पर्यटक (महिला) अत्यवस्थ आहे. सदर महिलेस शिरोडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. उर्वरित ४ पर्यटकांचा शोध स्थानिक शोध व बचाव पथक मार्फत सुरू असताना आज तहसीलदार वेंगुर्ला यांचेकडून प्राप्त माहितीनुसार बुडालेल्या 04 पर्यटकांपैकी फरहान मोहम्मद मणियार (वय वर्षे 20, राहणार कुडाळ) यांचा मृतदेह मिळाला आहे.
वेळागर समुद्रात बुडालेल्या ४ पैकी एकाचा मृतदेह सापडला!
0
68



