सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक संचालनालय यांच्या वतीने कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धेत सावंतवाडी येथील श्री. पंचम खेमराज महाविद्यालयाचा राष्ट्रीय खेळाडू असलेल्या आयुष दत्तप्रसाद पाटणकर यांनी नेमबाजी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक पटकाविले. ही स्पर्धा जिंकल्यामुळे त्याची आता राज्यस्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यापूर्वी वेंगुर्ला येथे झालेल्या स्पर्धेत आयुष यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला होता. गतवर्षी त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू हा पुरस्कार मिळाला होता. कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत आयुष्याने 400 पैकी 378 गुण मिळविले आहेत.
नवी दिल्ली येथे भारतीय खेळ प्राधिकरण येथे झालेल्या 64 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणाऱ्या सावंतवाडीच्या आयुष दत्तप्रसाद पाटणकर यांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. आयुष हा येथील श्री. पंचम खेमराज महाविद्यालयाचा विद्यार्थी असून तो येथील उपरकर शूटिंग रेंज मध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन के आहे.
यापूर्वी अहमदाबाद येथे झालेल्या प्री नॅशनलमध्ये आयुष्याने आपली पात्रता सिद्ध केली होती. डेरवण येथे झालेल्या स्पर्धेत आयुषने सुवर्णपदक तसेच वेंगुर्ला नगर परिषद परिषदेच्या स्पर्धेत एक सुवर्णपदक तसेच दोन सिल्वर पदके मिळविली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावणाऱ्या या घटनेबद्दल माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, संस्थेचे अध्यक्ष शुभदा देवी भोसले, लखमराजे भोसले, श्रद्धा देवी भोसले आणि प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, सिंधुदुर्ग पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष जितेंद्र पंडित, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे, अनारोजीन लोबो, तसेच शूटिंगच्या सर्व पदाधिकारी यांनी आयुषचे अभिनंदन केले आहे. आयुषच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.


