सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने भरतीसाठी रजिस्टर केलेल्या उमेदवारांसाठी बँकेतर्फे विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर आयोजित केली आहेत. सदर प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदवण्यासाठी बँक गुगल फॉर्म लिंक प्रसिद्ध करीत आहे. बँकेच्या या परीक्षेसाठी आयोजित मार्गदर्शन वर्गाचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ करून घ्यावा व सदर भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार असल्याने इतर कुठल्याही भरती संबंधित अफवांना बळी न पडता अभ्यासावर लक्ष केंद्रित करून परीक्षा चांगल्या मार्काने पास करावी व मेरिटमध्ये यावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांनी केले आहे. सदर प्रशिक्षण शिबिर हे पुढच्या आठवड्यापासून सिंधुदुर्गनगरी येथे सुरू होणार आहे.
सदर प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदवण्यासाठी उमेदवारांनी पुढील बँक गुगल फॉर्म लिंक भरावी –
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfbNu6Lft4lQY_7dnyjvHvws81Ec0RXmr9RSiKhlDC8xe4GIw/viewform?usp=header


