Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सचिन तेंडुलकरचा तीन दशकांचा जुना विक्रम मोडला. ; ‘या’ खेळाडूंचं वाढवलं टेन्शन, टीम इंडियात होणार का एंट्री?

बेंगळुरू : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी चाहत्यांच्या नजरा देशांतर्गत क्रिकेटवर लागल्या आहेत. दुलीप ट्रॉफी 2024 च्या पहिल्याच सामन्यात 19 वर्षीय मुशीर खानने आपली प्रतिभा दाखवली आणि शानदार शतक झळकावून माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा 33 वर्ष जुना विक्रम मोडला.

बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत अ विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या पहिल्या डावात मुशीरने 181 धावांची अत्यंत मौल्यवान खेळी खेळली. त्याने भारत ब संघाला अडचणीतून बाहेर काढले आणि चांगली धावसंख्या गाठण्यात मदत केली.

मुशीर खानने दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पणाच्या सामन्यात 181 धावा करत सचिन तेंडुलकरचा तीन दशकांचा जुना विक्रम मोडला. मुशीरने आता दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात युवा खेळाडूकडून तिसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली आहे.

मुशीर खानने मोडला सचिनचा विक्रम 

भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने 1991 मध्ये दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते. पश्चिम विभागाकडून खेळताना त्याने पूर्व विभागाविरुद्ध 159 धावांची शानदार खेळी खेळली. मात्र, आता हा विक्रम मुशीर खानने मोडला आहे. या विशेष यादीत बाबा अपराजित (212) पहिल्या स्थानावर आणि यश धुल्ल (193) दुसऱ्या स्थानावर आहेत.

मुशीर टीम इंडियात करणार एंट्री?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दृष्टिकोनातून दुलीप ट्रॉफीला महत्त्वाची भूमिका आहे. भारतीय संघ प्रदीर्घ काळानंतर कसोटी क्रिकेट खेळणार आहे आणि अशा परिस्थितीत निवडकर्ते या फॉर्मात असलेल्या खेळाडूंना संघात स्थान देऊ शकतात.

मुशीर खानच्या शतकामुळे टीम इंडियाच्या मधल्या फळीतील फलंदाजांचे टेन्शन वाढले आहे. दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यर काही खास करू शकला नाही आणि केएल राहुलनेही पहिल्या डावात निराशा केली. अशा परिस्थितीत या दोन्ही खेळाडूंच्या अडचणी वाढल्या आहेत.

मुशीर खानने अशीच फलंदाजी सुरू ठेवली तर निवडकर्ते त्याच्याकडे जास्त काळ दुर्लक्ष करू शकणार नाहीत आणि लवकरच त्याचा टीम इंडियात समावेश होऊ शकतो.

मुशीर खान यांची कारकीर्द –

19 वर्षीय मुशीर खानने आतापर्यंत एकूण 6 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्याच वर्षी मुंबई आणि बडोदा यांच्यात खेळल्या गेलेल्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत मुशीरने 203 धावांची शानदार खेळी खेळली. 10 डावात त्याने 58.77 च्या सरासरीने 529 धावा केल्या आहेत. या काळात त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे.

 

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles