मालवण : त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचालित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग या विद्यालयाच्या शाळा परिसराला दगडी कुपंण करण्यासाठी एल आय सी गोल्डन ज्युबिली फाउंडेशन मुंबई यांनी रुपये २३.०६ लाखांची देणगी दिली आहे. सदर देणगी त्यांनी मार्च २०२२ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत ४ टप्प्यात दिली आहे. या करीता संस्था एल आय सी, शाखा कणकवली आणि एल आय सी विभागीय कार्यालय, कोल्हापूर यांच्या माध्यमातून एल आय सी गोल्डन ज्युबिली फाऊन्डेनशी ऑगस्ट २०१९ पासून पत्रव्यवहाराद्वारे आणि दुरध्वनीद्वारे संपर्क साधून होती. एल आय सी अशा अनेक सेवाभावी संस्थांना देणग्या देऊन आपला शैक्षणिक कार्यातील वाटा उचलत आहे.
एल आय सी गोल्डन ज्युबिली फाउंडेशन मुंबई यांनी रु. २३.०६ लाख देणगी मंजूर केली आणि ४ हप्त्यात टप्प्याटप्प्याने देणगी पूर्ण केली. मार्च २०२२ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत एल आय सी च्या कणकवली, मालवण, विभागीय कार्यालय कोल्हापूर आणि मुंबई येथील मान्यवर अधिकाऱ्यांनी वेळोवेळी शाळा आणि शाळा परिसराला भेट देऊन बांधकामाची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले.
शिरवंडे गावातील ५ ग्रामस्थांनी आपली सामाईक ९.२५ एकर जमीन संस्थेला या शाळा प्रकल्पाकरीता बक्षिसपत्राने हस्तांतरित केली आहे. संस्थेने सदर जमिनीत एकूण १० खोल्यांची भव्य इमारत बांधली आहे. यात वर्ग खोल्या, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, व्यायामशाळा, सभागृह यांचा समावेश आहे. तसेच दोन बोअरवेल, पुरेशी स्वच्छतागृहे असून समोर मोठे मैदान तयार केले आहे ज्याठिकाणी शासनाच्या क्रीडा विभागामार्फत तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा आयोजित केल्या जातात. उर्वरित जमिनीत संस्थेने काजू, हापूस आंबा, नारळ, साग, सुपारी या वृक्षांची लागवड केली आहे.
जून १९९३ मध्ये शिरवंडे गावातील एका ग्रामस्थांच्या पडवीत सुरु झालेली ही शाळा आज संस्थेच्या गेल्या ३२ वर्षांच्या अथक प्रयत्नातून सर्व शैक्षणिक सुविधायुक्त अशा शाळेत रुपांतरित झाली आहे.
एल आय सी गोल्डन ज्युबिली फाउंडेशन मुंबई, यांच्या देणगीमुळे संस्थेची ९.२५ एकर जमीन सर्व दृष्टीने सुरक्षित झालेली आहे. संस्थेने एल आय सी गोल्डन ज्युबिली फाउंडेशन, मुंबई आणि त्यांचे संबंधित अधिकारी यांचे आभार मानले आहेत.
शिरवंडे येथील त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाला LIC ‘गोल्डन ज्युबिली फाऊंडेशन, मुंबई’ कडून तब्बल २३.०६ लाखांची देणगी.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


