Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे राज्यस्तरीय किल्ले बांधणी स्पर्धा-२०२५ चे आयोजन.

वैभववाडी : दरवर्षी दिवाळीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे गड-किल्ले उभारण्याची परंपरा अनेक वर्षापासून अखंडपणे चालत आलेली आहे. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना नुकतेच UNESCO तर्फे जागतिक वारसा स्थळांचे नामांकन प्राप्त झाले आहे. छत्रपतींचा इतिहास या निमित्ताने सातासमुद्रापार पोहोचला. मराठी मनाला अभिमानास्पद असलेल्या या घटनेचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्व गिर्यारोहण संस्थांची शिखर संघटना असलेल्या “अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ” तर्फे राज्य पातळीवर किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी ज्या १२ किल्ल्यांना हे नामांकन प्राप्त झाले आहेत त्याच किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करायच्या आहेत. या अनोख्या स्पर्धेचे आयोजन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या विविध जिल्हा संघटनांच्या मार्फत महाराष्ट्राच्या विविध भागातील प्रमुख शहरांमध्ये दिनांक १७ ते २३ ऑक्टोबर या कालावधीमध्ये करण्यात आले आहे. ‘MARATHA MILITARY LANDSCAPES OF INDIA’ म्हणून ज्या किल्ल्यांना हे नामांकन प्राप्त झाले. त्या किल्ल्यांची भौगोलिक रचना तसेच त्या किल्ल्यांचे ऐतिहासिक व सामारिक महत्त्व सर्वांना समजावे व या किल्ल्यांबद्दल समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पुढील वर्षी ही स्पर्धा व्यापक स्वरुपात आयोजित करणार असल्याचे महासंघाचे अध्यक्ष श्री.उमेश झिरपे यांनी सांगितले.
ही स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली असून, विजेत्यांना अत्यंत आकर्षक व उपयुक्त अशी पारितोषिके, ढाल व प्रशस्तीपत्र अशी बक्षीसे महासंघाकडून देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे. सदर स्पर्धेसाठी एक गुगल फॉर्म तयार केलेला आहे या स्पर्धेचे प्रमुख समन्वयक म्हणून महासंघातर्फे राहुल मेश्राम (९८३३३९४०४७) व डॉ.राहुल वारंगे (९४२२६९२१८७) हे काम पाहत आहेत. यावर्षी प्रथमच जिल्ह्यातील मालवण आणि विजयदुर्ग या दोन ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करीत आहोत. मालवण तालुक्यातील स्पर्धकांनी डॉ.कमलेश चव्हाण (९३७१७३९६६६) व श्री.प्रविण कदम (९३२३२९४५३०) तर विजयदुर्ग येथील स्पर्धाकांनी श्री.राजेंद्र परुळेकर (९४२१२६१६६२) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच स्पर्धेसंबंधी अधिक माहितीकरिता स्पर्धा समन्वयक प्रा.एस.एन.पाटील (९८३४९८४४११) यांना संपर्क करावा.

गुगल फॉर्म लिंक –

https://forms.gle/6pD24KHndLAMi6Yd8

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles