सावंतवाडी : शिवसेनेत प्रवेश स्वखुशीने होत आहेत.कोणी स्वार्थासाठी येत नाही. विकासकामांसाठी येत आहेत. एकनाथ शिंदे कुटुंबप्रमुख म्हणून काम करत आहेत. आमच्याकडे आणखीनही लोकं येतील. रिझल्ट देणार काम असाव, असं मी ठरवलं आहे. लोकांचा विश्वास जिंकणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. महायुतीच काय?, याच परवा सगळं चित्र स्पष्ट होईल, उद्याची बैठक महत्वाची ठरणार आहे, अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली.
आम. राणे पुढे म्हणाले, आम्ही महायुतीत लोकसभा, विधानसभा लढलो. त्यामुळे आताही महायुतीसाठी आम्ही प्रयत्न केले. आम्ही कोणाला कमी लेखत नाही. एकत्र लढावं हीच भुमिका आमची आहे. आमची ताकद आहे. मात्र, ताकद रोज दाखवायची नसते. एकत्रित लढावं एकमेकांच्या विरोधात उभं राहू नये ही भुमिका आहे. कार्यकर्त्यांना अडचणी टाकू नये म्हणून आमची भूमिका युतीची आहे. आमच्या निवडणूका नसुन कार्यकर्त्यांच्या निवडणूका आहेत. त्यामुळे कार्यकर्तांना अडचणीच होऊ नये म्हणून आमची ती भूमिका आहे. उद्याच्या बैठकीत सगळं चित्र स्पष्ट होईल, असं मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, अशोक दळवी, दीपलक्ष्मी पडते, दादा साईल, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, प्रेमानंद देसाई, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.


