भाजपा म्हणजे राष्ट्रीय विकासाचा विचार अन् ध्येयवादी दिशा! : भाजपा युवा नेते विशाल परब. ; तळेखोलमध्ये दुमदुमला भाजपा विचारांचा जयघोष!, असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश.

दोडामार्ग : “विकास हा आमचा धर्म आणि सेवा ही आमची ओळख.!” या ध्येयाने प्रेरित होत तळेखोल गावातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वावर, खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनावर आणि युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या संघटन कौशल्यावर ठेवलेला विश्वास — या प्रवेशातून स्पष्टपणे दिसून आला.

कोकणात भाजपाचा विस्तार हा केवळ राजकीय घटना नसून, विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.

“भाजपा हा एक राष्ट्रीय विकासाचा विचार आणि ध्येयवादी दिशा आहे. राष्ट्रहिताच्या मार्गावर नेणारी विचारप्रणाली आहे ,” असं मत युवा नेते विशाल प्रभाकर परब यांनी व्यक्त केलं.

या प्रसंगी माजी तालुका अध्यक्ष श्री. रंगनाथ गवस, दोडामार्ग शहराध्यक्ष श्री. राजेश फुलारी, शंकर फटि गवस, महेंद्र, महादेव गवस, उमेश महादेव गवस, सगुण नकुळ मोरजकर, अक्षय वासुदेव गवस
रुपेश लक्ष्मण गवस, विजय लक्ष्मण धर्णे, प्रकाश शशिकांत गवस, सुशांत सुरेश गवस, गुरूदास सदा गवस, लक्ष्मण लाडु धर्णे, गितांजली गुरुदास गवस,
शुभम अंकुश गावडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles