फरिदाबाद : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते असे म्हटले जाते. असाच एक भयानक प्रकार भर मंडपात घडला आहे. एका युवकाने प्रेमात मुलीच्या मंडपात फिल्मी स्टाईलमध्ये कुऱ्हाड घेऊन एण्ट्री केली. त्यामुळे नवरीचा तर थकाप उडालाच परंतू तिच्या होणाऱ्या पतीचेही हातपाय लटपटले. वऱ्हाडींची तर पार बोबडीच वळली आता करायचं काय कारण त्या युवकाने, तर थेट ”तुम मेरी नहीं तो किसी और की नहीं हो सकती!”, असा डायलॉग मारला. पुढे जे झाले ते आणखी भयानक होते. फरिदाबाद येथील एका लग्न झालेला तरुणाने (धर्मवीर, 30) त्यांच्या प्रेयसीच्या लग्नात मोठा बखेडा केला. त्याने वधू-वराचा लग्न विधी सुरु असताना फिल्मी स्टाईलमध्ये कुऱ्हाड घेऊन व्यासपीठावर एण्ट्री केली. त्याने तु माझी झाली नाहीस तर कुणाचीही तुला होऊ देणार नाही असा डायलॉग मारला. त्यानंतर तर उपस्थित लोकांची बोबडी वळली. परंतू या तरुणाला कसे तरी इतर लोकांनी पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. तेथे त्याने आणखीन मोठा पराक्रम केला.
फरिदाबादच्या रामनगरात वधू-वरांवर अक्षता पडणार इतक्यात एक वॅगनआर कार लग्नाच्या मंडपात शिरली. त्यातून एक तरुण बाहेर पडला. त्याच्या हातात मोठी पिशवी होती. अचानक त्याने बॅगेतून कुऱ्हाडच काढली आणि हे लग्न होऊ शकत नाही असे तो मोठ्याने ओरडला.त्यानंतर सभागृहात हाहाकार उडाला. त्या तरुणाला कसे तरी लोकांनी पकडले आणि पोलिसांना पाचारल केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात नेले. त्याने स्वत:च्या बॅगेतून पेट्रोल काढून नंतर स्वत:वर शिंपडले आणि स्वत:ला आग लावून दिली. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली.
पोलिसांनी या तरुणाची आग कशी तरी विझवली आणि त्याला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या तरुणाला ५० टक्के भाजले असून तो उत्तर प्रदेशातील कोसीकला येथे राहणारा असल्याचे उघडकीस आले. धर्मवीर ( ३० ) असे त्याचे नाव असून आता त्याच्यावर ICU उपचार सुरु असून तो सध्या बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
चार वर्षांपासून रिलेशनमध्ये लग्न झालेला प्रेमी –
सेक्टर -११ च्या पोलिस चौकीचे अधिकारी सुनील यांनी सांगितले की आरोपी १० वर्षांपासून लग्न झालेला असून तो तीन मुलांचा बाप आहे. त्याचा मथुरा येथे कॅफे आहे. गेल्या चार वर्षांपासून तो या तरुणीशी रिलेशनमध्ये आहे. तिचे लग्न होतेय हे माहिती झाल्यानंतर तिला लग्न करु नको असे त्याने म्हटले होते. परंतू तिने त्याचे म्हणणे ऐकले नाही. मग लग्नाच्या दिवशी दारुच्या नशेत त्याने मंडपात येऊन हा धिंगाना घातला.मुलगी आधी एक खाजगी नोकरी करत होती. परंतू लग्न ठरल्यानंतर तिने हा जॉब सोडला. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपीवर उपचार सरु आहेत.


