– सोनेरी आठवण म्हणून शाळेला दिली स्मार्ट टीव्ही भेट तसेच परिसरात केल वृक्षारोपण!
सावंतवाडी : आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल मधील सन २००५ बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आपल्या गुरुजनांबरोबर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर शाळा समिती अध्यक्ष अण्णा झांट्ये,माजी मुख्याध्यापक तुकाराम खाणगावकर, माजी मुख्याध्यापक उमा प्रभू,प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत ,शिरोडा हायस्कूल चे मुख्याध्यापक मंगेश कांबळी ,माजी सहा.शिक्षक एस वाय.पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य रा.गो. सामंत सरांच्या प्रतिमेस तसेच सरस्वती देवीच्या मूर्तीला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
उपस्थित सर्वांनी यावेळी आपली ओळख,तसेच सर्वांचे स्वागत केले.
या स्नेहमेळ्याव्यात उपस्थित गुरुजनांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तब्बल वीस वर्षांनी एकत्र आल्याचा आनंद उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त करताना ,शाळेतील आठवणी जाग्या करत,शाळेचा विकास होत असताना आपल्या ग्रुप च्या वतीने लागेल ती मदत शाळेला करणार असल्याचे सांगितले. तर काहींनी शाळेची पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहनही केले.
माजी मुख्याध्यापक तुकाराम खाणगावकर यांनी स्नेहमेळाव्याबाबत समाधान व्यक्त करत,आपल्या प्रशालेतील आठवणी जाग्या करत शाळेला आपण सर्वांनी मिळून प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करूया असे सांगितले.
तर, सहा.शिक्षक एस .वाय.पाटील यांनी खरोखरच असे स्नेहमेळावे दरवर्षी आयोजित करून आपली शाळेबद्धलची ओढ अशीच टिकवून ठेवावी व आपल्या शाळेबद्दलचा आदर उत्तरोत्तर वाढवत शाळेची प्रगती साधण्याचे आवाहन केले.
उमा प्रभू यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितले की,कोणतेही काम हे कमी पणाच नसत,मात्र आपल काम हे नम्रतेच, प्रामाणिक असावं.जेणेकरून आपल्याला शांत झोप येईल.कोणालाही फसवून ,लुबाडून किंवा वाईट मार्गाने जाणे हे कधीही अयोग्यच आहे.म्हणून सर्वांनी प्रामाणिकपणा बाळगा आणि असेच सर्वांनी एकत्र येत आपली मैत्री टिकवून ठेवा.
तर शिरोडा हायस्कूल चे मुख्याध्यापक मंगेश कांबळी यांनी उपस्थितांना संबोधताना सांगितले की,आपल्या गावात बरेच कलाकार आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल तर ते नक्कीच मोठे कलाकार घडतील.आपण सुद्धा दशावतार कलेचे उपासक असून,आपण विद्यार्थ्यांमधील कला ओळखून त्यांना प्रोत्साहन देत असतो.प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी आपल मनोगत व्यक्त करताना सांगितले की,खरोखरच आपल भाग्य आहे की ,आपल्याला आजगाव विद्याविहार मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.या संधीच आपण नक्की सोन करू.कारण येथील विद्यार्थी , पालक,ग्रामस्थ,यांचे शाळेबद्दल प्रेम,माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य यामुळे आपण शाळेला प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करणार असून,येथील शैक्षणिक दर्जा,विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याचा आपल्या सर्वांच्या सहकार्यातून करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात माजी विद्यार्थांनी आपली आठवण म्हणून शाळेला स्मार्ट टीव्ही,तसेच परिसरात वृक्षा रोपण केलं आणि आपल्या परीने जे शाळेला सहकार्य लागेल ते करणार असल्याचे सांगितले.
उपस्थित सर्व माजी विद्यार्थांना शिक्षकांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वेश आजगावकर तर आभार सोमा केदार यांनी मानले.
यावेळी शिक्षकेतर कर्मचारी धर्माजी निकम,अण्णा पांढरे (शिपाई ) उपस्थित होते.


