पणजी : गोवा हिंदी अकादमीच्या माध्यमातून हिंदी भाषेला आत्मसात करून अभिव्यक्त होण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे .तेव्हा हिंदी भाषेच्या प्रगतीसाठी भविष्यात अकादमीच्या वतीने विविध उपक्रमाद्वारे भाषा संवर्धनाचे श्रेष्ठ कार्य होईल यात शंकाच नाही, असे मत प्रमुख पाहुणे शिक्षण उपसंचालक डॉ. उदय गांवकर यांनी गोवा हिंदी अकादमीच्या पाचव्या वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्त इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात बोलताना व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे शिक्षण उपसंचालक डाॅ. उदय गांवकर, उद्घाटक सांकवाळचे माजी सरपंच रमाकांत बोरकर, अकादमीचे अध्यक्ष प्रा. सुनील शेट, सरचिटणीस प्रा. लक्ष्मीकांत परब, कोषाध्यक्ष उदय नाईक आदि उपस्थित होते.

उद्घाटक या नात्याने बोलतांना रमाकांत बोरकर म्हणाले गोव्यासारख्या अहिंदी प्रदेशात हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु असलेले कार्य खरोखरच प्रशंसनीय असे आहे. या निमित्ताने का होईना आम्हाला हिंदीतून अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
सुरवातीलाच उद्घाटक रमाकांत बोरकर व डाॅ उदय गांवकर व इतरांकडून दिप प्रज्वलन करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष प्रा.सुनील शेट यानी तर वार्षिक अहवाल प्रा.लक्ष्मीकांत परब यांनी सादर केला.
सौ. रंजना नाईक, सौ. सुनयना शेट व सौ. कांचन बोरकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. तृप्ति प्रभु आजगांवकर, डाॅ. स्नेहांकिता शेट,प्रा. अस्मिता पांगम व प्रा.मालीनी काणेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्रा. मिरा शिरोडकर, प्रा. सुचिता कुबल, सुनयना शेट, हेमंती परब, मालीनी काणेकर, डाॅ.स्नेहांकिता शेट यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले.
सत्कार मूर्ती प्रा. सुदेश गांवकर यांचा शाल,श्रीफळ ,स्मृतीचिन्ह, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुणे डाॅ उदय गांवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्य स्तरीय एकल नृत्य स्पर्धेचे परीक्षण सौ. अंजू राजपूत देसाई व सौ. मंजित बेदी गुप्ता यांनी केले.
डाॅ.उदय गांवकर व रमाकांत बोरकर यांच्या हस्ते सोलो डान्स, कथा कथन, निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन, तसेच दहावी व बारावीत हिंदी विषयांत विद्यालयात सर्वाधिक अंक प्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शन करणारे शिक्षकांचा गौरव करण्यात आला. शेवटी आभार प्रदर्शन सचीव हेमंती परब यानी केले.
फोटो ओळी: गोवा हिंदी अकादमीच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन करून उद्घाटन करतान उद्घाटक रमाकांत बोरकर, बाजुलाच प्रमुख पाहुणे डाॅ. उदय गांवकर, उदय नाईक, सुनील शेट व लक्ष्मीकांत परब.
सत्कार मूर्ती प्रा. सुदेश गांवकर यांचा सत्कार करताना डाॅ उदय गांवकर व इतर मान्यवर.


