– भूषण आरोसकर.
सावंतवाडी: क्रीडा व कलात्मक संस्कृतीला व्यासपीठ प्राप्त करून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागामध्ये वाचन चळवळ रुजविण्यासाठी कुणकेरी गावामध्ये क्रीडा आणि कला विकास मंडळाची स्थापना करण्यात आली होती. गेली 41वर्षे हे मंडळ विविध कलात्मक,क्रीडात्मक,सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे राबवित असून गावाच्या विकास कार्यात तसेच सामाजिक चळवळीमध्ये सक्रीयआहे. नुकतीच या मंडळाच्या नवीन कार्यकरणीची निवड करण्यात आली. या मंडळाच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदचे आदर्श तसेच उपक्रमशील शिक्षक श्री.नितीन नामदेव सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली,तसेच उपाध्यक्षपदी जिल्हा परिषदचे आदर्श तसेच उपक्रमशील शिक्षक श्री. अरविंद नारायण सरनोबत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
मंडळाच्या सचिवपदी श्री.राजन गोविंद मडवळ, सहसचिवपदी श्री. एकनाथ गोविंद सावंत, खजिनदारपदी श्री.विश्राम सुधाकर सावंत तसेच संचालक म्हणून माजी सभापती श्री.प्रमोद मोहन सावंत,श्रीम.निता नितीन सावंत,श्री.भरत भाऊ सावंत, श्री.गणेश दत्ताराम परब,श्रीम. रचना रघुनाथ आळवे,श्रीम.रोहिणी रमेश गावडे यांची निवड करण्यात आली . मंडळाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मंडळाचा मानस आहे.


