कोलगाव केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत शाळा आंबेगाव नं. १ अव्वल!

– भूषण आरोसकर.

सावंतवाडी : कोलगाव केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत शाळा आंबेगाव नं.1 ने जनरल चॅम्पियनशीप मिळवत घवघवीत यश प्राप्त केले. तब्बल 32 चषकांसह शाळा आंबेगाव नं.1 अव्वल ठरली. मोठा गट( मुलगे) कबड्डी व खो खो-विजेते ,मुली – खो खो -उपविजेते ,गौरव सुभाष गावडे- 200 मी धावणे प्रथम तर उंच उडी- तृतीय , विकास विठ्ठल शेळके- उंच उडी- व्दितीय, लांब उडी-संग्राम यशवंत मेस्त्री – प्रथम तर समित न्हानू कुंभार -तृतीय , गोळाफेक-सोहम प्रदीप सावंत – प्रथम आणि कार्तिक ठकू वरक – तृतीय, 100×4 रिले -मुलगे -उपविजेता
मोठा गट (मुली)- 100 मी धावणे – लक्ष्मी नाना वरक -व्दितीय ,उंच उडी-ईश्वरी नागेश सावंत-तृतीय क्रमांक रूची बिरु शेळके 200 मी.धावणे तसेच लांब उडीमध्ये तृतीय ,गोळा फेक- समृद्धी चंद्रकांत परब- व्दितीय तर कनिष्का अमोल सावंत-तृतीय ,
लहान गटात मुलांनी खो -खोचे विजेतेपद मिळवले तर मुली कबड्डी मध्ये विजेत्या ठरल्या. 50×4 रिले- मुली -विजेते, मुलगे- उपविजेते, प्रज्ञा परेश तेली 50 मी धावणे- तृतीय,रिद्धी बिरू शेळके 100 मी धावणे- व्दितीय तर उंच उडीमध्ये तृतीय, अनुष्का उमेश गवळी उंच उडी -प्रथम तर 100 मी धावणे तृतीय, स्वरा विनय पालकर – लांब उडी- द्वितीय, गौरेश सावळाराम जाधव -लांब उडी आणि 100 मी धावणे-प्रथम , समूहगीतामध्ये लहान व मोठ्या गटाने विजेतेपद पटकावले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री. प्रदीपकुमार म्हाडगुत, श्रीम. रसिका नाईक, क्रीडा शिक्षक श्री.नितीन सावंत , श्रीम.स्नेहल कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल केंद्रप्रमुख श्रीम.भावना गावडे, आंबेगाव सरपंच श्री.शिवाजी परब , उपसरपंच श्री. रमेश गावडे, शा.व्य.समिती अध्यक्ष श्रीम.तेजस्वी गावडे तसेच सर्व पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles