Thursday, December 25, 2025

Buy now

spot_img

इस्कॉन सावंतवाडीतर्फे उद्या ‘आरपीडी’च्या मैदानावर रंगणार सुमधुर भजन संध्या! ; भजन, कीर्तनासह आध्यात्मिक नाटिकेची मिळणार मेजवानी.

सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन), सावंतवाडी शाखेच्या वतीने उद्या रविवार दिनांक २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात भव्य ‘भजनसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने अध्यात्मिक विचारांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे, अशी माहिती इस्कॉन सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष वासूश्रेष्ठ दास यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राधाश्रुत प्रभूजी, प्रकाश रेडकर, राजेश वाडकर, उदय भराडी, देवकीपुत्र प्रभूजी उपस्थित होते.

या सोहळ्यासाठी इस्कॉनचे जगदविख्यात गुरु महाराज प.पू. लोकनाथ स्वामी महाराज आणि अमेरिकन संन्यासी प.पू. श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज उपस्थित राहणार असून त्यांची कीर्तने व प्रवचने होणार आहेत. तसेच नोएडा येथील श्रीमान सुबल गोपाल प्रभू यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. कार्यक्रमात भजन, कीर्तन आणि विशेष नाटिकेचे सादरीकरण केले जाणार असून यावेळी ‘महाप्रसादाचे’ आयोजन केले आहे. यावेळी वासूश्रेष्ठ दास यांनी प.पू. लोकनाथ स्वामी महाराजां बाबत माहिती देताना सांगितले की, त्यांनी भारतात २५ हून अधिक मंदिरे उभारली असून पंढरपूर येथेही त्यांचे मोठे सेवाकार्य सुरू आहे. इस्कॉन संस्था जगभरातील १५० पेक्षा जास्त देशांत भागवत धर्म आणि भगवद्गीतेचा प्रचार करत आहे.

सावंतवाडी शाखेला यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. लवकरच सावंतवाडी शाळांमध्ये भगवद्गीतेवर आधारित परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.

सहस्त्रनाम प्रभूजी म्हणाले, “मानवी जीवनात भक्तीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. व्यक्तीची चेतना बदलण्याचे कार्य भक्तीद्वारे घडते. मनुष्य जन्म आणि जीवन पूर्णतृप्त कसे करावे, याचे मार्गदर्शन या भजनसंध्येच्या माध्यमातून केले जाईल.” सावंतवाडी आणि परिसरातील भाविकांनी या आध्यात्मिक सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉन सावंतवाडी व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles