सावंतवाडी : सर्व भाषेची जननी म्हणून ज्या भाषेला जागतिक मान्यता मिळालेली आहे. त्या संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे या उद्शाने अटल प्रतिष्ठान कार्यरत असून प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रम राबविले जातात.
कुडाळ येथील यशस्वी उद्योजक व कुडाळ एम आय डी सी इंडस्ट्रिज असोशियनचे उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर यांनी त्यांचे वडील स्व. महादेव उर्फ नारायण भास्कर पावसकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा प्रायोजित केलेली असून या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना बांबूपासून बनविलेली आकर्षक स्मृतिचिन्हे देण्यात येणार असून सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.
सदर स्पर्धा तीन गटात होणार असून पहिला गट हा इयत्ता पाचवी ते सहावी आहे त्यासाठी गणपती स्त्रोत्र पाठांतर स्पर्धा असुन यामध्ये अचुक पाठांतर व उच्चार शुद्धता याला प्राधान्य देण्यात येणार आहे. स्पर्धेचा दुसरा गट इयत्ता सातवी ते आठवी असुन या गटामध्ये संस्कृत गीत गायन स्पर्धा असुन यामध्ये गेयता व उच्चार शुद्धता विचारात घेतले जाणार आहे. आणि तिसऱ्या गटातील स्पर्धा ही इयत्ता नववी ते दहावी यासाठी संस्कृत कथाकथन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. यामध्ये पाठांतर, मांडणी व कथेची निवड हे निकष विचारात घेतले जातील.
सदर स्पर्धा रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे ९:३० ते १२:३० या वेळेत घेण्यात येत असून प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतुन स्पर्धेसाठी तीन निवडक विद्यार्थी पाठवावे. या स्पर्धेची नाव नोंदणी दिनांक ५ जानेवारी २०२६ पर्यंत कु. ज्योती राऊळ, द्वारा अटल प्रतिष्ठान कार्यालय माठेवाडा सावंतवाडी मोबा.नं. ९४०४७५६८९५ येथे करावी. असे आवाहन अटल प्रतिष्ठानच्या वतीने अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर व संस्थेचे कार्यवाह डॉ. राजशेखर कार्लेकर यांनी केले आहे.


