Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

विश्वगुरु व्हायचं, तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा.! ; नितीन गडकरींची तुफान फटकेबाजी.

नागपूर : लोकशाहीत सर्वोच्च पदावरच्याने प्रखर टीका सहन करावी असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. राजाविरूद्ध कितीही बोललं तरी ते राजाने सहन करावं असं गडकरी म्हणाले. राजाने प्रखर टीकेवर चिंतन करावं, टीका सहन करणं ही राजाची सर्वात मोठी परीक्षा असते असं गडकरी म्हणाले. साहित्यिक,विचारवंतांनीही परखडपणे विचार मांडावे असं गडकरी म्हणाले.  विश्वगुरु व्हायचं तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा असाही सल्ला गडकरींनी दिला आहे.

नितीन गडकरी म्हणाले,  आपल्या लोकशाहीमध्ये  साहित्यिकांबद्दल,कवीबद्दल,विचारवंतांकडून तरी अपेक्षा आहे की त्यांनी आपले विचार परखड पणे मांडले पाहिजेत. लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा कोणती असेल तर राजाच्या विरोधात कितीही कोणीही परखडपणे  विचार मांडले तरी ते राजाने सहन केले पाहिजे आणि त्या विचारावर चिंतन केले पाहिजे हीच खरी लोकशाही मधील अपेक्षा असते.आई मला नेहमी सांगायची लहानपणी निंदकाचे घर असावे शेजारी आपल्याला दिशा देणारा माणूस जो आहे तो आपल्याला सांगणार आहे आपले काय चुकलं काय बरोबर आहे.

महाराष्ट्र संतांची भूमी आहे.  महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. प्रत्येक व्यक्तीकडून जे चांगला आहे ते आपण घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट होती की, त्यांनी अनेक वेळा विजय मिळवल्यानंतर कधीही परधर्मीयांची पूजा, मंदिर उद्ध्वस्त केली नाहीत. विरोधी असणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केला त्यांना घरी पाठवलं.  एका अर्थाने त्यांनी आदर्श राजाचा परिचय करून दिला.  सर्वधर्मसमभावाच जुन्या इतिहासातील सगळ्यात चांगलं उदाहरण कुठल असेल छत्रपती शिवाजी महाराज आहे याचा मला विश्वास आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles