सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे येथे नववर्ष स्वागतासाठी रंगणार धमाल विनोदी नाटक ‘भटाची बायपास’. श्री सिद्धेश्वर ग्रामोत्कर्ष मंडळ, तळवडेचे आयोजन., नाट्य व कला प्रेमींचे होणार बहारदार मनोरंजन
सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे येथील श्री सिद्धेश्वर ग्रामोत्सव मंडळ, तळवडे यांच्या वतीने यावर्षी नववर्ष स्वागत कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. शिवशक्ती कला-क्रीडा मंडळ, कोनापाल यांच्या सहकार्याने या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक व विनोदी कलाविष्कार सादर होणार आहेत.
कार्यक्रमात धमाल विनोदी दोन अंकी नाटक ‘ भटाची बायपास’ सादर होणार असून तळवडे ग्रामपंचायत समोरील पटांगणात हा नाट्य प्रयोग 31 डिसेंबर रात्री दहा वाजता होणार आहे. प्रेक्षकांना भरपूर मनोरंजनाचा मेवा मिळणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन सतीश वारंग यांनी केले असून मुख्य भूमिका नारायण शेटकर, नंदू तोरस्कर, सतीश वारंग, गोट्या मेस्त्री, नारायण नाईक, आनंद मेस्त्री, प्रणाली कासले, हर्षदा बागायतकर, दिक्षा वेंगुर्लेकर यांनी साकारल्या आहेत.
हा उपक्रम बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर रोजी रात्री १०.०० वाजता पार पडणार असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाश परब मित्र मंडळ तळवडे, तळवडे अर्बन बँक, तळवडे, सेवा सोसायटी तसेच सर्व सेवाभावी संस्था, तळवडे, सर्व गावकर मंडळी व ग्रामस्थ मंडळी तळवडे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
यावेळी उपस्थित राहून नववर्ष स्वागत सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


