सावंतवाडी : तालुका माध्यमिक अध्यापक संघ आयोजित आणि जि. प. चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ शंकर पेडणेकर पुरस्कृत जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे पार पडली.
या स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची सहावीतील विद्यार्थिनी सानिका आत्माराम नाईक हिने ‘पर्यावरण संरक्षण – माझी जबाबदारी’ या विषयावर ओघवत्या शैलीत वक्तृत्व सादर करून उपस्थित लोकांची व परीक्षकांची मने जिंकली. तिला पाचवी ते सातवी या गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तिला गौरविण्यात आले.
शाळेच्या शिक्षिका संपदा राऊळ यांचे तिला मार्गदर्शन लाभले. सानिकाने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा अॅड.अस्मिता सावंत भोसले व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी तिचे अभिनंदन केले.
भोसले स्कूलची सानिका नाईक जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अव्वल.! ; ओघवत्या वक्तृत्व शैलीने जिंकली उपस्थितांची मने.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


