सावंतवाडी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र मार्फत आयोजित दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा-2023 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडेली, जांभरमळाच्या सहाय्यक शिक्षिका श्रीमती प्रियांका वरक यांनी वेंगुर्ला तालुका स्तरावर सहावी ते आठवी गटांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत तर तिसरी ते पाचवी च्या गटात द्वितीय क्रमांक प्राप्त करीत घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल वेंगुर्ला परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. बदलत्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा पार पाडण्यासाठी ई- साहित्य निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळां मधील शिक्षकांसाठी ही स्पर्धा गेल्या वर्षी आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी अनेक शिक्षक यामध्ये सहभागी झालेले होते. जि. प. प्राथमिक शाळा आडेली, जांभरमळा च्या शिक्षिका श्रीमती प्रियांका वरक यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल केंद्र प्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ पदाधिकारी, सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी त्यांचे अभिनंदन केले.
व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये आडेली जांभरमळा शाळेच्या शिक्षिका प्रियांका वरक यांचे सुयश.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


