Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सामाजिक सेवा कार्यातून लायन्स क्लबची चांगली प्रतिमा निर्माण करा.! : गजानन नाईक.

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लायन्स इंटरनॅशनलचा जन्म झाला आहे. त्यातूनच ‘वुई सर्व्ह’ हे लायन्स क्लबचे ब्रीद वाक्य निर्माण झाले असून समाजातील गरजा ओळखून लायन्सनी सेवा कार्य करून लायन्सची प्रतिमा उज्वल करावी, असे आवाहन लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या रत्नागिरी येथील रिजन बैठकीत चेअरमन ला. गजानन नाईक यांनी केले.


लायन इंटरनॅशनलच्या रीजन 5 च्या 18 क्लब ची एकत्रित बैठक आणि ग्याट सेमिनार रत्नागिरी येथे हॉटेल लँडमार्क सभागृहात पार पडले. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अॅड. एम. के. पाटील, उपप्रांतपाल डॉ. वीरेंद्र चिखले , प्रमुख वक्ते माजी प्रांतपाल लायन केशव फाटक, लायन जगदीश पुरोहित, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर डॉ. शेखर कोवळे, माजी प्रांतपाल उदय लोध आदि मान्यवर उपस्थित होते.
रिजन ग्याट सेमिनार मध्ये लायनची सदस्य संख्या कशी वाढवावी, लायन्सची समाजात प्रतिमा कशी उजळावी याबाबत ला. केशव फाटक यांनी मार्गदर्शन केले. ला जगदीश पुरोहित यांनी संघर्षावर आणि अडीअडचणीतून मार्ग काढीत आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करावयाचे प्रयत्न यावर मार्गदर्शन केले .डॉ. शेखर कोवळे यांनी लाईनीझम हे व्रत आहे ,जगभरात कुठेही आपत्ती आली तरी त्यासाठी मदतीचा हात तात्काळ देणारी ही जागतिक संघटना असून या संघटनेचे जास्तीत जास्त सदस्य व्हावे असे आवाहन केले.
प्रांतपाल एड. एम के पाटील यांनी रिजन मधील लायन्स क्लबच्या सेवा कार्याचे कौतुक केले. सेवाकार्य आणि संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रत्येक लायन्सने उद्दिष्ट ठरवून घ्यावे आणि त्यानुसार कामाला लागावे असे आवाहन केले. माजी प्रांतपाल उदय लोध यांनी रीजनच्या एकजुटीचे महत्त्व विशद केले.
प्रारंभी रिजन चेअरमन ला. गजानन नाईक यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांचे शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.
दुसऱ्या सत्रात रिजन मधील लायन्स क्लबच्या कार्याचा आढावा क्लब अध्यक्ष आणि झोन चेअरमन यांनी घेतला.
झोन चेअरमन विश्वास गावकर डॉ. निलेश पाटील, श्रीमती प्रांजल गुंजोटे, श्रीमती शुभदा पोटे यांनी आपल्या झोनमधील कार्याचा आढावा घेतला.
रिजन सेक्रेटरी श्री. अमेय पै यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. ला. ओंकार फडके, श्रीनिवास परांजपे आदींनी मनोगत व्यक्त केले.
रत्नागिरी लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी आणि त्यांच्या टीमने कार्यक्रमाचे नियोजन केले.
माजी रिजन चेअरमन ला. गणेश प्रभुलकर यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles