सावंतवाडी : अलीकडे निवडणुका तोंडावर यायला लागल्या की, अनेक जण ज्या दिशेला वारा वाहतो त्याच दिशेला वाहू लागतात, खरं तर हे काम कचऱ्याचं आहे.
एकेकाळी आपल्याला राजकारणातील कोणतीही ओळख नसताना आपल्या मैत्रीला जागणाऱ्या पदाधिकाऱ्याने आपली स्वतः जबाबदारी घेऊन वरिष्ठ नेत्यांपर्यंत काही लोकांची गाठ घालून दिलेली असते व त्याचं वरदहस्तमुळे ह्या लोकांचं अस्तित्व निर्माण होत असतं. मात्र आपलं अस्तित्व टिकवून ही काही लोकं जीवापाड काळजी घेणाऱ्या पदाधिकाऱ्यालाचं विसरतात, आणि दगडापासून हिरा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केलेले ते दिवस, गरजेच्या वेळेस केली मदत, असं सर्व काही विसरून ज्या दिशेला वारा वाहतो त्याच दिशेला धावू लागतात. मग त्यांना मागच्या आयुष्यातील अडचणीच्या प्रसंगी तात्काळ केलेली त्या पदाधिकाऱ्यांची मदतसुद्धा आठवत नाही. आणि मग या अशा परिस्थितीत विरोधक घडलेल्या घटनांचा लाभ घेतात, अशी टीका अलीकडे बदललेल्या राजकीय परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते अमित वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
आपल्या प्रसिद्धी पत्रकात अमित वेंगुर्लेकर पुढे म्हणतात की, जबाबदार पदाधिकारऱ्यांनी सोबत निवडलेल्या कार्यकर्त्यांमधून आपल्या सोबत हृदयापासून सद्सद् विवेकद्धीचा विचार करून दिलेले काम पदाधिकाऱ्यांच्या व संबंधित राजकीय पक्ष्यांच्या हितासाठीच करत आहेत का ?, याबाबत सूक्ष्म विचार करणं अपेक्षित आहे. निवडणुकीच्या तोंडावर असे अनेक प्रश्न निर्माण होतात, त्याचं मूळ कारण म्हणजे पदाधिकाऱ्याचा आपल्या कार्यकर्त्यावर असलेला अविश्वास. तिसऱ्या व्यक्तीचं ऐकून अगदी जबाबदारीने कामं करणाराऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर अविश्वास दाखवणे.
मग काही लोक ज्या दिशेला वारा वाहतो त्याच दिशेला पळतात, खरं तर हे काम कचऱ्याचं आहे
असं बोलून मोकळे होतात,आणि मग विरुद्ध बाजूस असलेल्या एकनिष्ठ नेत्यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुद्धिबळाने आखलेल्या राजनितीचाच विजय होतो. परंतु सर्वसामान्य गोरगरीब जनतेला याचा फटका बसतो. मनामध्ये असंख्य विचार निर्माण होतात, नक्की मतदान कोणत्या पदाधिकाऱ्याला करायचं ? या बाबतचा विचार पक्का होई तोपर्यंत आचारसंहिता जाहीर होण्याची वेळ जवळ आलेली असते. अशा परिस्थितीत विरोधक घडलेल्या घटनांचा लाभ घेतात आणि पुन्हा पाच वर्षांकरिता सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मात्र महागाई,बेरोजगारी,आरोग्य सेवेतील अभाव, खड्डेमय रस्ते अशा असुरक्षित अर्थव्यवस्थेस सामोरं जावं लागतं.
या बाबतचा विचार सर्व पक्षीय संघटनांनी आपआपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा, सुसंवाद व एकमेकांबद्दल गैरसमज तळून करावा जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी येणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये योग्य उमेदवारास स्वछ मनाने मतदान करून आपल्या जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सुख सुविधांचा तुटवडा भरून काढण्याकरिता योग्य उमेदवारास मतदान करा असेआवाहन मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठनतर्फे प्रदेश सचिव श्री अमित वेंगुर्लेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यवासियांना पत्रकार माध्यमांशी बोलताना केले आहे.


