सावंतवाडी : आज सायंकाळी ७ वाजता रोणापाल येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा निवेदक प्रा. रूपेश पाटील यांचा ‘खेळ पैठणीचा’ हा बहारदार कार्यक्रम रंगणार आहे. ज्ञान, मनोरंजन आणि हास्याचे फवारे असलेला हा दणदणीत कार्यक्रम प्रा. रुपेश पाटील सादर करणार असून रोणापाल गावातील माता – भगिनींनी या कार्यक्रमास सहभागी होऊन भरघोस बक्षिसे जिंकावी, असे आवाहन आयोजक श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ, रोणापाल यांनी केले आहे
सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल येथे श्री देवी माऊली मंदिर रोणापाल यांचा नवरात्रोत्सव धुमधडाक्यात सुरू आहे. त्यानिमित्ताने श्री देवी माऊली संस्कृतिक उत्सव मंडळ रोणापाल यांचेमार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ रोणापाल यांनी केले आहे.