सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि तालुका समन्वय समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा बांदा येथे नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत जनता विद्यालयाने विविध मैदानी प्रकारात घवघवीत यश मिळवले. विद्यालयाचे एकूण ३० खेळाडू सहभागी झाले होते. पैकी 16 खेळाडूंनी प्राविण्य प्राप्त केले.
14 वर्षाखालील मुली लांब उडी आरूषी सुनील सावंत तृतीय क्रमांक, 100 मीटर धावणे धनश्री प्रभाकर कुंभार प्रथम क्रमांक, 400 मीटर धावणे-साक्षी संदीप पेडणेकर प्रथम क्रमांक, 600 मीटर धावणे – कुमारी श्रावणी यशवंत दळवी प्रथम क्रमांक.
गोळा फेक – कुमारी आर्या देवदास सावंत- द्वितीय क्रमांक.
रिले 4× 100 मुली- प्रथम क्रमांक या विजयी संघा मध्ये धनश्री प्रभाकर कुंभार, श्रावणी यशवंत दळवी, आरुषी सुनील सावंत, श्रुती महेश जाधव, साक्षी संदीप पेडणेकर या खेळाडूंचा समावेश होता.
14 वर्षाखालील मुले 100 मीटर धावणे आर्यन अजित नागडे -प्रथम क्रमांक 600 मीटर धावणे सहदेव आना गावडे तृतीय क्रमांक रिले 4 × 100 मी. प्रथम क्रमांक या संघांमध्ये आर्यन अजित नागडे, विघ्नेश सतीश शिरोडकर, सुरज सिताराम गावडे, गुरुनाथ रमाकांत मांजरेकर, ज्ञानेश सुनील गावडे या खेळाडूंचा समावेश होता.
17 वर्षाखालील मुली-
लांब उडी – पूजा तुकाराम सावंत प्रथम क्रमांक, सुरेखा हरी केरकर – द्वितीय क्रमांक.
100 मीटर धावणे – पूजा तुकाराम सावंत प्रथम क्रमांक.
200 मीटर धावणे – सुरेखा हरि केरकर द्वितीय क्रमांक.
400 मीटर धावणे- रंजना प्रवीण परब-तृतीय क्रमांक.
800 मीटर धावणे – कोमल सचिन नाईक तृतीय क्रमांक.
मुली 4×100 रिले- प्रथम क्रमांक या संघामध्ये पूजा तुकाराम सावंत, रंजना प्रवीण परब, सुरेखा हरी केरकर, तन्मयी संदेश पावणोजी, विभावरी प्रशांत मांजरेकर या खेळाडूंचा समावेश होता.
17 वर्षाखालील मुले – 200 मीटर धावणे विराज रवींद्र गावडे-द्वितीय क्रमांक.
वरील सर्व प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या यशस्वी खेळाडूंची निवड जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे. चालू वर्षी 17 वर्षाखालील मुलींचा खो-खो चा संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला. तसेच 14 वर्षांखालील मुली कबड्डीचा संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला. व 17 वर्षाखालील मुलगे कबट्टी हा संघ द्वितीय क्रमांकाने विजय झाला. वरील सर्व खेळाडूंना प्रशालेचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक व पर्यवेक्षक दयानंद बांगर, क्रीडा शिक्षक विजय सोनवणे, शांताराम गवई, प्रवीण गोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. वरील सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन प्रशालेचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वसंस्था पदाधिकारी, पालक – शिक्षक संघ यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.