Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

भाजप नेते निलेश राणे हाती घेणार धनुष्यबाण.! ; उद्या कुडाळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.

कुडाळ : राज्यातील महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार कुडाळ विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेला गेला आहे. हा मतदार संघ गेल्या दहा वर्षात विकासात मागे गेला आहे. त्यामुळे आपण हा बॅकलॉग भरून काढतानाच एकविसाव्या शतकातील विकसित मतदार संघ करण्यासाठी आपण शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर भव्य सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश करणार आहे, अशी माहिती निलेश राणे यांनी सांगितले.

याबाबत माहिती देण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी विनायक राणे, राकेश कांदे, पप्या टवटे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना श्री. राणे म्हणाले, मी २०१९ साली वडील खा. नारायण राणे यांच्या समवेत भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. या पक्षात खूप आदर मिळाला. सर्व नेत्यांनी प्रेम, आदर दिला. पक्ष शिस्त शिकता आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लहान भावाप्रमाणे सांभाळले, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही भावाप्रमाणे सांभाळले. सर्वच नेत्यांनी सांभाळले. आपले या पक्षातील सर्वच नेत्यांशी जीवाभावाचे सबंध आहेत. यापुढेही राहतील. मी पक्ष शिस्त मानणारा आहे. प्रोटोकॉल पाळणारा आहे. आतापर्यंत वडील नारायण राणे यांच्या म्हणण्यानुसार वागत गेलो. परंतु महायुतीच्या वाटाघाटी नुसार काम करावे लागते. लोकसभेत २७ हजार मतांचे लीड मिळाले. जिल्हा बँक, सर्व खरेदी विक्री संघ, सहकारी संस्था भाजपच्या ताब्यात घेतल्या. ९० टक्के ग्रामपंचायती भाजपकडे आणल्या. परंतु मी घेतलेला निर्णय नेत्यांनी ठरविलेला आहे. मला एका गोष्टीचे समाधान वाटते, ते म्हणजे वडील नारायण राणे यांची सुरुवात ज्या चिन्ह, पक्षात झाली. त्याच पक्ष, आणि चिन्हावर काम करण्याची संधी मिळाली आहे. भाजपमधील सबंध होते तसे पुढेही राहतील. निवडणूक जिंकणे हेच टार्गेट आहे. शिस्त पाळत आपण राजकारण करीत
असतो. मी आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे.
आपण पक्ष हितासाठी हा निर्णय घेतलेला आहे. बाळासाहेब हे आमचे कायम दैवत राहणार. माझी स्पर्धा आमदार विरोधात नाही. मी त्यांच्यावर टीकाही करणार नाही. परंतु आपला मतदार संघ महाराष्ट्रात टॉप पाचमध्ये राहण्यासाठी माझा असेल. गेल्या दहा वर्षात मतदार संघ मागे गेला आहे. हा मतदार संघ एकविसाव्या शतकातील मतदार संघ वाटला पाहिजे. उद्या पक्ष प्रवेशवेळी माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी यायचे ते येणार. कुडाळमध्ये आतापर्यंत झाला नाही एवढा मोठा कार्यक्रम येथे होणार आहे, असेही निलेश राणे यांनी सांगितले

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles