Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

संजू परब यांना माजी आमदार राजन तेली, परशुराम उपरकर यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही : आशिष सुभेदार.

सावंतवाडी : निवडणूक लढवण्याची घोषणा करून नंतर पैसे घेऊन माघार घेणारे भाजपा पक्षाचे स्वयंघोषित आणि आत्ताचे स्वार्थासाठी धनुष्यबाण हाती घेणारे संजू परब यांना शिवसेना उबाठा पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांच्यावर तसेच माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. सावंतवाडी शहरात जमीन दलाली करुन लोकांना फसवणाऱ्या याच परब विरोधात तहसील कार्यालयासमोर जनतेने उपोषण केले होती ही बाब त्यानी विसरू नये, असा टोला उबाठा पक्षाचे शिवसैनिक आशिष सुभेदार यांनी लगावला.
शिवसेना उबाठा पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्यावर संजू परब यांनी टीका केली त्याचा सुभेदार यांनी खरफुस शब्दात समाचार घेतला.
केसरकर व दुसऱ्यांवर जमिनी लुटण्याचा आरोप करणारेच आता त्यांच्या आजू बाजूला बसलेले असतात. संजू परब हे जमीन व्यवहार मधील मोठे दलाल आहेत. शिरवळात जमीन घोटाळा कोणी केला हे संजू परब यांनी आम्हाला बोलायला लावू नये तर चराठा येथील एका जमीन प्रकरणात संजू परब यांच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर उपोषणास कोण बसल होत ते सावंतवाडीच्या जनतेला माहित आहे. राणींकडे देखील ती महिला पुरावे घेऊन गेली होती त्यामुळे दलाल कोण आहे हे आता सर्वश्रृत आहे.
पनवेल मध्ये डान्सबार येथे कोण सापडलं आणि कोणामुळे सुटलात यांनी त्यामुळेच तुम्ही आज त्यांची बाजू घेत आहात.
शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मध्यरात्री विनायक राऊतांना भेटणाऱ्या संजू परब यांचे निलेश राणेंवरील प्रेम बेगडी आहे. हे विनायक राऊत एक दिवस उघड करतीलच. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना हेच परब लोकांना मी तीन कोटी आणि नगराध्यक्ष पदाची ऑफर घेणार असे ओरडून सांगत होते त्यामुळे या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी परब यांनी केसरकर यांच्याकडून किती कोटी घेतले हे त्यानी जाहीर करावे अशा पासून केसरकर यांनी सावध राहावे असा सल्ला दिला. उपरकर हे दलाल नसून हाडाचे शिवसैनिक आहेत. ते मशाल या निशाणीचा प्रचार कारत आहेत कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते कट्टर शिवसैनिक आहेत. मात्र तुम्ही चार दिवसांपूर्वी कुठे होता कोणाचा प्रचार करत होता हे आठवा तर तुम्ही कमळ सोडून हाती धनुष्य बाण का घेतला किती रुपयांना व्यवहार झाला हे ही लवकर जाहीर करावे लागेल असा इशार शिवसैनिक आशिष सुभेदार दिला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles