Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

आ. नितेश राणे यांचा फणसेमध्ये उबाठाला ‘दे दणका’, असंख्य उबाठा कार्यकर्ते भाजपामध्ये, विकास कामांसाठीच आ. नितेश राणे यांचे नेतृत्व स्वीकारले.

देवगड : फणसे येथील उबाठा सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. फणसे हे गाव पूर्वी उबाठा सेनेचा प्राबल्य असलेले गाव होते, मात्र आमदार नितेश राणे यांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला प्रभावीपणे उभे केले आहे.

या पंचक्रोशीत आमदार नितेश राणे यांनी अनेक सुविधा दिल्या आहेत. त्यांनी रस्ते आणि दूरसंचाराच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास वाढला आहे. म्हणूनच, कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याचे प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

प्रवेश करणाऱ्यांमध्ये आशिष थोटम, अनिकेत थोटम, ओंकार थोटम, सुरेश थोटम, दिनेश थोटम, आयुष थोटम, सुशांत नवलू, सुदेश नवलू, महेंद्र राणे, रोहित थोटम तसेच फणसे गावातील इतर असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी बाळा खडपे, संदीप साटम, बंड्या नारकर, अमोल तेली, गणेश राणे, रवी पाळेकर, आणि उत्तम बिरजे उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles