विज्ञान नाट्योत्सवात कळसुलकर इंग्लिश स्कूलचे यश!

सावंतवाडी :  राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर, विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आणि स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२६ (तालुकास्तरीय) स्पर्धा स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल येथे उत्साहात पार पडली.

या स्पर्धेचा विषय ‘विज्ञान आणि समाज’ हा होता. या स्पर्धेत कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन तृतीय क्रमांक पटकावला.

या विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि परीक्षा सांभाळून कमी वेळात केलेल्या तयारीतून हे यश मिळवले आहे. शाळेचे प्रतिनिधित्व चिन्मय विक्रम कोटणीस, देवेश सुधाकर आडेलकर, सोहम गुरुनाथ चितारी, ओम सखाराम तिळवे, आर्यन विश्वनाथ जाधव, अलिशा यशवंत मेस्त्री, स्वरा अभय वाटवे, दूर्वा अतुल केसरकर, विभव तुषार विचारे, दूर्वा अजित सावंत आणि गार्गी राजेश परब या ११ विद्यार्थ्यांनी केले.

या विद्यार्थ्यांना शाळेच्या *विज्ञान प्रमुख श्रीमती बांदेलकर एस. यु. तसेच सांस्कृतिक प्रमुख डी. ई. सारंग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस . व्ही.भुरे, पर्यवेक्षक श्री. वराडकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थी व मार्गदर्शयांचे हार्दिक अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles