Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सातार्डा बाजारपेठेत भरधाव डंपरची दोन दुचाकींना धडक, सुदैवाने जीवितहानी नाही.

संजय पिळणकर
सावंतवाडी :   सातार्डा  – देवूळवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेजवळ मुख्य रस्त्यावर भरधाव चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरने (जीए ०३ एन ७३०८) रस्त्याच्या बाजूला असलेल्या दोन दुचाकींना (ज्युपिटर एम एच ०७ आर ७०९६ व ज्युपिटर (एम एच ०७ आर एल ३८७२) धडक दिल्याने दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले.


दरम्यान अपघातस्थळी मच्छिविक्रेते असल्याने तेथे मच्छि खरेदी करण्यासाठी गर्दी होती.या गर्दीच्या ठिकाणी अपघात होऊनही सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
दरम्यान डंपर व डंपर चालकावर बेदरकारपणे वाहन चालवणे,डंपरचा इन्शुरन्स नसणे,फिटनेस प्रमाणपत्र नसणे,चिरे वाहतूकीचा परवाना नसणे आदी बाबींची पोलिसांनी शहानिशा करून डंपर व डंपर चालकावर गुन्हा नोंद करण्यात यावा यासाठी जागरूक ग्रामस्थ अर्जुन सातार्डेकर व उपस्थित ग्रामस्थांनी पोलिसांना विनंती केली.


यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक दळवी अपघातस्थळी उपस्थित होते.त्यांनी संतप्त जमावाला पांगवण्यास यश मिळविले.अधीक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक दळवी करत आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles