Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीत चौरंगी लढत, सहापैकी चार उमेदवार अपक्ष.

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी एकूण सहा उमेदवार रिंगणात उरले आहेत. यामध्ये युतीकडून दीपक केसरकर तर आघाडी करून राजन तेली यांच्यासह बंडखोरी केलेले अर्चना घारे-परब, विशाल परब, सुनील पेडणेकर आणि दत्ताराम गावकर या अपक्षांचा समावेश आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अर्चना घारे व महायुतीच्या विशाल परब यांनी बंडांचा झेंडा हाती घेतला होता. हे दोघे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का ? याकडे सर्वांचा लक्ष होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तीन वाजेपर्यंत या दोघांकडून आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला नसल्याने सावंतवाडी मतदारसंघांमध्ये आता चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

मतदारसंघात एकूण दोन लाख तीस हजार दोन एवढे मतदार असून त्यामध्ये महिला मतदार 1 लाख 15 हजार 354 तर पुरुष मतदार 1 लाख 14 हजार 648 एवढे आहेत. प्रत्येक तालुक्याचे मतदार लक्षात घेता दोडामार्ग मध्ये 40 हजार 754 वेंगुर्ल्यामध्ये 67 हजार 985 तर सावंतवाडीमध्ये सर्वात जास्त म्हणजे 1 लाख 21 हजार 263 एवढे मतदार आहेत.

दरम्यान, उमेदवार निश्चित झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले. यावेळी ते म्हणाले, सहा उमेदवारासह नोटा पकडून एकूण सात बटणे मतदान यंत्रावर असणार आहेत. निवडणुकीच्या आधी दोन दिवस म्हणजेच 18 तारीख ला सायंकाळी सहा वाजता निवडणुकीचा प्रचार संपणार आहे. 19 रोजी सकाळपासून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्र पाठवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रत्येक उमेदवाराने प्रचारासाठी आपल्या प्रतिनिधीकडून परवानगी घेणे गरजेचे आहे. मतदान हे वीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे. यासाठी आवश्यक ती पोलीस बंदोबस्त तसेच इतर यंत्रणा राबविण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles