रमेश आरोसकर
सावंतवाडी : शिवसेना शिंदे गटाच्या मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघ युवा संघटकपदी नितीन कळंगुटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना तालुका प्रमुख नारायण राणे यांनी सोमवारी ही नियुक्ती केली. नितीन कळंगुटकर हे सामाजिक कार्यात तसेच पर्यावरणप्रेमी म्हणून कार्य करत असून त्यांनी कित्येक समस्या शासनदरबारी पोहोचवत जनतेला न्याय मिळवून दिला. त्यांच्या कार्याची दखल घेत शिवसेना तालुका प्रमुख नारायण राणे यांनी त्यांची मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघ युवा संघटकपदी नियुक्ती केली. हे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, महिला शहरप्रमुख भारती मोरे, उपतालुकाप्रमुख गजानन नाटेकर, मळेवाड शाखा प्रमुख तानाजी खोत, उपसंघटक राजन रेडकर, प्रविण चौगुले आदी पदाधिकारी उपस्थित होते.


