मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची धुळे ग्रामीणचे तरुण तडफदार आमदार राघवेंद्र उर्फ रामदादा मनोहर भदाणे – पाटील यांनी सहकुटुंब भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी जनतेने दिलेला आशीर्वाद पुढील कार्यासाठी नक्की उपयुक्त ठरेल, असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला.

दरम्यान जनतेच्या प्रत्येक आशेच्या पूर्ततेसाठी कटिबद्ध असल्याचे अभिवचन यावेळी नवनिर्वाचित आमदार रामदादा भदाणे – पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती तथा नगाव गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ. ज्ञानज्योती भदाणे, शितल भदाणे तसेच रामदादा भदाणे यांच्या सौभाग्यवती भदाणे, रावसाहेब गिरासे पैलवान यांसह रामदादा भदाणे यांचे समर्थक व कार्यकर्ते उपस्थित होते.


