Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

३० नोव्हेंबरला भारत – पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, टीम इंडिया जाहीर!

नवी दिल्ली : आशिया अंडर – 19 स्पर्धेला 29 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या 11 व्या पर्वाचं आयोजन युएईत करण्यात आलं आहे. गतविजेत्या बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या सामन्यापासून स्पर्धेला सुरुवात होईल. आशिया अंडर 19 स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी झाले आहेत. तसेच चार चार संघांचे दोन गट पाडले आहेत. भारत अ गटात असून यात पाकिस्तान, जापान आणि यूएई हे संघ आहेत. भारत पाकिस्तान एकाच गटात असल्याने या दोन्ही संघांकडे आहे. स्पर्धेत क्रीडप्रेमींचं लक्ष हे भारत पाकिस्तान सामन्याकडे लागून आहे. 30 नोव्हेंबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत पाकिस्तान संघ आमनेसामने उभे ठाकणार आहेत. मागच्या पर्वात भारतीय संघ जेतेपदापासून दूर राहिली होती. पण या स्पर्धेत भारताचा दबदबा राहिला आहे. भारताने मागच्या 10 पर्वात 8 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे 11 व्या पर्वातही भारतीय संघ प्रमुख दावेदार मानला जात आहे.

स्पर्धेत भारताचा दुसरा सामना जापानशी होणार आहे. हा सामना शारजाहच्या मैदानावर 2 डिसेंबरला होणार आहे. तर 4 डिसेंबरला भारत आणि यूएई यांच्यात लढत होणार आहे. साखळी फेरीत दोन सामने जिंकल्यास उपांत्य फेरीत स्थान पक्कं होणार आहे. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आणि ऑनलाईन स्ट्रिमिंग हे सोनी स्पोर्ट नेटवर्कवर होणार आहे. तसेच सोनी लिव एपवर स्पर्धा पाहता येणार आहे. आशिया कप स्पर्धा वनडे फॉर्मेटमध्ये असणार आहे. भारतीय वेळेनुसार सर्व सामने सकाळी 10.30 वाजता सुरु होणार आहेत.

‘असे’ आहेत दोन्ही संघांचे खेळाडू –

भारत : मोहम्मद अमन (कर्णधार), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, सी आंद्रे सिद्धार्थ, किरण चोरमले (उपकर्णधार), प्रणव पंत, हरवंशसिंग पनगालिया (विकेटकीपर), अनुराग कवडे (विकेटकीपर), हार्दिक राज, मोहम्मद ईनान, केपी कार्तिकेय, समर्थ नागराज, युधाजित गुहा, चेतन शर्मा, निखिल कुमार.

पाकिस्तान : साद बेग (कर्णधार/विकेटकीपर), मोहम्मद अहमद, हारून अर्शद, तय्यब आरिफ, मोहम्मद हुजेफा, नवीद अहमद खान, हसन खान, शाहजेब खान, उस्मान खान, फहम-उल-हक, अली रझा, मोहम्मद रियाजुल्ला, अब्दुल सुभान, फरहान युसूफ, उमर झैब.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles