Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

साने गुरुजींचे साहित्य भावी पिढीला प्रेरणादायक.! – प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर.

कणकवली :  साने गुरुजींचे साहित्य भावी पिढीला प्रेरणादायक आहे. भावी पिढीने साने गुरुजींनी लिहिलेली पुस्तके वाचायला हवीत. या पुस्तकांच्या माध्यमातून युवा पिढीमध्ये देश प्रेम, सामाजिक समता, बंधुता आणि निर्भयता जागृत व्हायला मदत होईल असे प्रतिपादन गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी गोपुरी आश्रमाच्या वतीने ‘९ ऑगस्ट, क्रांती दिनाच्या’ निमित्ताने आणि साने गुरुजी १२५ जयंती अभियानांतर्गत गोपुरी आश्रमात आयोजित साने गुरुजींच्या पुस्तकांवरील विवेचन स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धकांना मार्गदर्शन केले.


साने गुरुजींचे प्रत्येक पुस्तक वाचकाला माणूस म्हणून घडण्याची प्रेरणा देते. साने गुरुजींचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी गोपुरी आश्रमातर्फे साने गुरुजी १२५ जयंती अभियान २४ डिसेंबर, २०२४ पर्यंत राबवण्यात येत असून या अभियानांतर्गत साने गुरुजींच्या विचारावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील साने गुरुजींनी लिहिलेल्या पुस्तकाचे विवेचन स्पर्धा आज रोजी गोपुरी आश्रमात संपन्न झाली.
या स्पर्धेत अनुक्रमे हेमंत पाटकर यांनी ‘चित्रकार रंगा’ या पुस्तकाचे विवेचन केले. तर कु. मेघा दळवी हिने ‘पत्री’ कविता संग्रहावर आपले मनोगत व्यक्त केले. कु. दर्शना पाताडे हिने ‘चिंतालिका’ या अनुवादित पुस्तकावर विचार व्यक्त केले. समीक्षा राणे हिने ‘श्यामची आई’ या पुस्तकावर भाष्य केले. काशिनाथ वर्देकर यांने ‘कावळे’ या साने गुरुजींच्या पुस्तकावर विवेचन केले, तर सिद्धी परब हिने ‘भारतीय संस्कृती’ या पुस्तकावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.

 

या निमित्ताने साने गुरुजींच्या वाचकांना माहिती नसलेल्या पुस्तकांचा परिचय झाला. या स्पर्धेत अनुक्रमे काशिनाथ वर्देकर याला ‘प्रथम क्रमांक’ प्राप्त झाला. द्वितीय क्रमांक दर्शना पाताडे हिला मिळाला, तृतीय क्रमांक मेघा प्रवीण दळवी हिला देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. किरण मेस्त्री हिने केले. तर आभार संचालिका अर्पिता मुंबरकर यांनी मांनले. या कार्यक्रमाला गोपुरी आश्रमाचे उपादयक्ष विजय सावंत, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, सदस्य विनायक सापळे, सदाशिव राणे, कवी श्रेय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सहदेव पाटकर, मयुरेश तिर्लोटकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचा बक्षीस वितरण २४ डिसेंबर, २०२४ रोजी गोष्ट एका विशेष कार्यक्रमात होणार आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles