Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

स्व. भाईसाहेब सावंत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत समीक्षा मर्गज अव्वल, तर प्राची सावंत द्वितीय.! ; ‘आरपीडी’त रंगल्या वक्तृत्व स्पर्धा.!

सावंतवाडी : येथील शिक्षण प्रसारक मंडळ,सावंतवाडी. संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व जुनियर कॉलेज सावंतवाडी आयोजित स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आज संपन्न झाल्या. या स्पर्धेची सुरुवात दीप प्रज्वलन तसेच स्व. नामदार भाईसाहेब सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव गुरुवर्य व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, संचालक चंद्रकांत सावंत, माजी मुख्याध्यापिका सोनाली सावंत, प्रभारी मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक संजय पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना प्रभारी मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकरांनी स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत यांच्या कार्याचा आढावा घेत वक्तृत्व स्पर्धेचे उद्दिष्ट आणि हेतू सांगून स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे सचिव व्ही. बी. नाईक यांनी भाईसाहेब सावंत हे अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीतून एक शेतकरी, आदर्श शिक्षक, समाजकारण आणि राजकारण या जीवनाच्या खडतर प्रवासातून संघर्ष करत आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आणि हेच आत्ताच्या पिढीपर्यंत सर्व दूर पोहोचले पाहिजे व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल. असे सांगत निकोप स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थ्यांना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष अमोल सावंत यांनी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत स्वर्गीय भाईसाहेब यांच्या कार्यकर्तृत्वाचे दाखले देत त्यांचा आदर्श आपण आपल्या जीवनात जोपासले पाहिजे. आपल्या जीवनाला यशस्वी आकार दिला पाहिजे, असे स्पष्ट केले.

स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील 21 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

या स्पर्धेसाठी – १) गांधी इंजीनिअरिंग आणि ग्रामविकास,  २)अस्थिर राजकारण – एक आव्हान, ३) परिक्षेतील स्पर्धा – असुरक्षित विद्यार्थी, ४) संस्काराची विद्यापीठे हरवत चालली आहेत का? – या विषयांवर किमान सात मिनिटे इतक्या वेळेत आपले विचार मांडायचे होते. सर्व सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण आणि चिंतनयुक्त असे विचार वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने मांडण्याचा एकापेक्षा एक असे सरस प्रयत्न केले.

या स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभलेले कवी मनोहर परब आणि प्रा. हर्षवर्धनी जाधव यांनी विजेते घोषित केले. त्यानुसार वैयक्तिक विजेते प्रथम क्रमांक – समीक्षा सुभाष मर्गज (दादासाहेब तिरोडकर ज्युनिअर कॉलेज, पणदूर), द्वितीय – प्राची गोविंद सावंत (आर.पी.डी ज्युनियर कॉलेज, सावंतवाडी), तृतीय – विजया सुरत पावसकर (गुलाबताई दीनानाथ नाईक विद्यालय, वेतोरे), तर उत्तेजनार्थ अदिती अवधूत राजाध्यक्ष (आर. पी. डी. ज्युनियर कॉलेज, सावंतवाडी), गायत्री गिरीधर मुंज (कॉलेज कुडाळ यांना मिळाला. तसेच सांघिक विभागात फिरत्या ढालीचे मानकरी प्रथम विजेता संघ म्हणून आर. पी. डी ज्युनियर कॉलेज, सावंतवाडी घोषित करण्यात आले.

या स्पर्धेच्या बक्षिस वितरणप्रसंगी संस्था सचिव व्ही बी नाईक, सदस्य च. मु. सावंत उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी स्पर्धा परीक्षा कमिटी प्रमुख म्हणून प्रा. महाश्वेता कुबल यांच्यासमवेत कॉलेजमधील सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा. विनिता घोरपडे, प्रसिद्धी कमिटी प्रमुख प्रा. रणजीत राऊळ, प्रा. डॉ.संजना ओटवणेकर, प्रा. संतोष पाथरवट, प्रा. डॉ. अजेय कामत, प्रा. सविता कांबळे, प्रा. पवन वनवे, प्रा. दशरथ सांगळे, प्रा. वामन ठाकूर, प्रा. स्मिता खानोलकर, प्रा. माया नाईक, प्रा. जोसेफ डिसिल्वा, प्रा. राहुल कदम, प्रा. विजया सावंत, प्रा. निलेश कळगुंटकर,  प्रा. पुनम वाडकर, प्रा. प्रणिता मोरजकर, प्रा. विधीता गवंडे, प्रा. प्रांजल वाडकर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विशाल शितोळे, प्रा. मिलिंद कासार यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी मानले.

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles