Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

२०२४ मध्ये Google मध्ये कुणाचा सर्वाधिक शोध घेण्यात आला?

मुंबई : अवघ्या काही दिवसात जुन्या वर्षाला निरोप द्यावा लागणार आहे. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी अख्खी दुनिया सज्ज झाली आहे. नवीन वर्ष साजरं करण्यासाठीचा प्रत्येकजण प्लान करत आहे. नवीन नवीन स्पॉट शोधत आहेत. एन्जॉय कसं करता येईल आणि खासकरून कुटुंबासोबत कसा दिवस घालवता येईल याचा प्लान करत आहेत. पण काही लोकं गेल्यावर्षाचा आढावा घेताना दिसत आहे. या वर्षाने काय दिलं? काय घेतलं? याबद्दल अनेक लोक विचार करत आहेत.

लोकंच नाही तर गुगलही गेल्या वर्षीच्या घटनांचा आढावा घेत आहे. गुगलने 2024ची एक यादी तयार केली आहे. त्यानुसार गेल्या वर्षात म्हणजे 2024मध्ये कोणत्या विषयांचा सर्वाधिक शोध घेण्यात आला, कोणत्या व्यक्ती, ठिकाणं, जेवण, रेसिपी, खेळ, गाणी, संगीतकार शोधले गेले याचा या यादीत समावेश आहे. जगभरातील आणि देशानुसार ही यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा कल कोणत्या गोष्टीत अधिक होता. त्यांच्या आवडीनिवडी काय होत्या हे समजणं सोपं झालं आहे.

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, मनोरंजन क्षेत्रातील 2024 मध्ये सर्वाधिक (वर्ल्डवाइड) सर्च केलेली व्यक्ती म्हणून भारताच्या दोन अभिनेत्रींचं नाव आलं आहे. मात्र, या यादीत दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय किंवा आलिया भट्ट यांचं नाव नाही, त्याऐवजी इतर दोन अभिनेत्रींचं नाव आहे. गुगलने जाहीर केलेल्या यादीनुसार, 2024 मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या 10 अभिनेता-अभिनेत्रींमध्ये फ्लॉप अभिनेत्री हिना खान आणि निमरत कौर यांचंही नाव आहे.

यादीत असलेल्या इतर व्यक्ती क्रमवारीनुसार :

केट विल्यम्स

पवन कल्याण

अॅडम ब्रेडी

एला पर्नेल

हिना खान

कायरन चुलकिन

टेरेंस हावर्ड

निमरत कौर

शाटन फॉस्टर

ब्रिगेट बज्जो

हिना खान सध्या स्तनाच्या कर्करोगाशी झुंज दे आहे. सोशल मीडियावरवरून ती तिच्या आरोग्याबाबत अनेक वेळा अपडेट्स शेअर करत असते. हिना खानने अनेक हिंदी मालिकांमध्ये अभिनय केला आहे आणि काही चित्रपटात देखील काम केलं आहे. दुसरीकडे, निमरत कौर सध्या चर्चेत आहे, पण ती कोणत्याही चित्रपट किंवा वेब सीरिजमुळे नाही, तर काही इतर कारणांमुळे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होईल असा आरोप तिने केला होता. यामुळे, हिना खान आणि निमरत कौर यांचे नाव 2024 मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या 10 प्रमुख व्यक्तींच्या यादीत सामील झालं आहे.

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles