सावंतवाडी : येथील सुधाताई कामत शाळा नं. २ येथे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांची मोफत आरोग्य तपासणी करुन तपासणी केलेल्या मुलांना आवश्यक औषधे समता महिला मंडळाच्यावतीने मोफत देण्यात आली.
यावेळी समता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ गायत्री देवस्थळी, सचिव सौ मंजिरी घोपेश्वरकर, खजिनदार सौ-प्राजक्ता पंतवालावलकर आणि मंडळाच्या इतर सर्व सदस्या उपस्थित होत्या या शिबिरात समता महिला मंडळाच्या सदस्या सौ. डॉ. सौ. संगिता तुपकर, डॉ.सौ. रेवती लेले, डॉ. सौ. रश्मी कार्लेकर यांनी सर्व मुलांची आरोग्य तपासणी केली.
सुधाताई कामत शाळा नंबर २ च्या मुख्याध्यापिका सौ. फाले व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी हे आरोग्य शिबिर घेण्यासाठी समता महिला मंडळाला मोलाचे सहकार्य केले. तसेच समता मंडळाच्या इतर सभासदांनीही या शिबिराचे नियोजन केले होते.
सुधाताई कामत शाळा नं. २ येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


